Home उतर महाराष्ट्र शनिदर्शनासाठी भक्तांची मांदियाळी कडाक्याच्या थंडीतही भाविकांची पहाटेच्या आरतीला गर्दी

शनिदर्शनासाठी भक्तांची मांदियाळी कडाक्याच्या थंडीतही भाविकांची पहाटेच्या आरतीला गर्दी

139

आशाताई बच्छाव

1001074041.jpg

शनिदर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
कडाक्याच्या थंडीतही भाविकांची पहाटेच्या आरतीला गर्दी.                                                               नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

शनिशिंगणापुरात आज दिवसभरात दोन लाख भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घेतला. वाहनांच्या प्रचंड गर्दीने गावात] तसेच सोनई व घोडेगाव रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
शनिवारी पहाटे साडेचार वाजता होणाऱ्या आरती सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अनेक भक्त मुक्कामी थांबले होते. कडाक्याची थंडी असताना
पहाटेच्या आरतीला हजारो भाविक उपस्थित होते. मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी अभिषेक, पूजन, तेल अर्पण करून आरती केली.
उपस्थित भक्तांनी ‘शनिदेव की जय’ व ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष केला. दुपारी झालेल्या मध्यान्ह आरतीला चौथरा परिसर गर्दीने फुलून गेला होता. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आरोग्य, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, प्रसाद, दर्शन व्यवस्था आदी सुविधा देण्यात आल्या. परराज्यांतोल दानशूर भक्तांनी चहा, नाश्ता व महाप्रसाद वाटप केले.

Previous articleबीड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांचा शब्द बीडकरांनो विश्वास ठेवा बद्दल घडवून आणणार
Next articleघोडेगाव शिवारात बनावट दारू कारखाना उध्वस्त!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.