Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अहिल्यानगर शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

137

आशाताई बच्छाव

1001072508.jpg

अहिल्यानगर शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –शहरात सुरु असलेल्या अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
संसार आणि युवकांचे जीवन उध्वस्त
शहरात गुन्हेगारी वाढत असून अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार आणि युवकांचे जीवन उध्वस्त होत आहे. हे अवैध धंदे कोणाच्या आशिर्वाद सुरु आहेत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया अवैध दुकाने थाटून निषेध नोंदविण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.