आशाताई बच्छाव
२४ डिसेंबरला भाजपा सदस्यता नोंदणी अभियान – जिल्हा कार्यशाळा..
_कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले._
दिनांक :- २३/१२/२०२४
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत देशव्यापी सदस्य नोंदणी अभियान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, गृहमंत्री तथा भाजपा ज्येष्ठ नेते अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली राबविण्याची घोषणा करण्यात आली.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने २१ डिसेंबरला नागपूर येथे प्रदेश कार्यशाळेचे आयोजन करून मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा. ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे.
प्रदेश कार्यशाळेचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत ‘सदस्यता नोंदणी अभियान – जिल्हा कार्यशाळा”
मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2024 ला सकाळी 11 वाजता सेलिब्रेशन फंक्शनाल हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
सदस्यता नोंदणी जिल्हा कार्यशाळा मा.अशोकजी नेते माजी खासदार भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जमाती मोर्चा, भाजपा ज्येष्ठ नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आमदार डॉ.मिलिंदजी नरोटे, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.देवरावजी होळी, माजी आमदार मा.कृष्णाजी गजबे, ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा बाबुरावजी कोहळे, लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे, प्रदेश सचिव भाजपा किसान मोर्चा रमेशजी भुरसे, माजी आमदार डॉ.नामदेवरावजी उसेंडी, प्रदेश सदस्य रविंद्रजी ओलालवार, ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, मोतीलालजी कुकरेजा, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रकाशजी गेडाम, सदानंद कुथे, योगिताताई पिपरे प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आलेली आहे.
सदस्यता नोंदणी अभियान जिल्हा कार्यशाळेला प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हा कायम निमंत्रित सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारणी सदस्य पदाधिकारी, आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष व महामंत्री, शहराध्यक्ष व महामंत्री जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर परिषद व नगरपंचायत सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.






