Home बुलढाणा सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला!

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0027.jpg

सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

भारत हा देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो तसेच श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो नागपंचमी नंतर रक्षाबंधन हा दुसरा महत्त्वाचा सण आहे. दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन संपूर्ण देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो त्याचप्रमाणे येथील सहकार विद्या मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने विद्यार्थी भावाच्या हातात राखी बांधली असून. यामुळे बहीण भावाच्या नात्याला एक प्रेरणा मिळते दरवर्षी हा सण ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो परंतु त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे सहकार विद्या मंदिर येथे दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा सण बहिण भावाचा सण म्हणून ओळखला जातो हा सण बहिण भावातील नातेदृढ करणारा व त्यांच्या मधील पवित्र नात्याचा सण आहे त्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून ओवाळते. भावाचे शत्रूपासून रक्षण व्हावे आणि त्याला दीर्घायुष्य लाभो अशी बहीण प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी घेत असतो. अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथील शिक्षक वृंदांकडून मिळाले असून त्यावेळी विद्यार्थी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here