Home पुणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम बाबुरावजी.रामचंद्र.घोलप विद्यालयात साजरा!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम बाबुरावजी.रामचंद्र.घोलप विद्यालयात साजरा!

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0036.jpg

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम बाबुरावजी.रामचंद्र.घोलप विद्यालयात साजरा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
कार्यक्रम व फ्रेंडशिप विथ कॉप्स स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील बाबुरावजी.रामचंद्र.घोलप माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव व फ्रेंडशिप विथ कॉप्स हा कार्यक्रम बारा घोलप माध्यमिक विद्यालय जुनी सांगवी याठिकाणी घेन्यातआला.सदरचा कार्यक्रमहा डॉक्टर.श्री अंकुश शिंदे सी.पी, श्री.संजय शिंदे जॉइंट सी.पी,श्री. आनंद भोईटे डीसीपी,श्री.श्रीकांत दिसले एसीपी वाकड,तसेच सांगवी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनिल टोणपे,श्री.मिनिनाथ वरुडे पोलिस उप निरीक्षक,यांनी मार्गदर्शन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा, पथनाट्ये,स्वातंत्र्यलढा.देशभक्ती, इत्यादी विषयांवर माहिती देऊन, त्यांना सदरचा उपक्रम शाळेमध्ये व आपले घरी व शेजारी राबवण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेले ऑनलाइन बँकिंग फसवणुक,युट्युब,फेसबुक,इंस्टाग्राम या सोशल मीडिया द्वारे होत असलेली फसवणूक व त्यांचा गैरवापर न करेबाबत,मुलांना गुन्हे करण्यापासून व व्यसनापासून दूर होण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.शाळेमध्ये अथवा शाळेच्या बाहेर शाळेतील मुलींना मुलांकडून छेडछाड.टिंगल टवाळी होत आसल्यास त्वरित ११२ नंबर डायल करून पोलीस मदत घेणेबाबत तसेच पोलिसांशी संपर्क साधने बाबत सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे मार्गदर्शन केले.सदर वेळी प्राचार्य मापारी सर व इतर शिक्षक तसेच ८ थी ते १२ वी या वर्गातील सुमारे ८00 ते ९00 विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक हजर होते.तसेच सांगवी पोलिस स्टेशन कडील पुरूष व महिला पोलीस अंमलदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here