Home मुंबई संजय राऊत यांना ८ आँगस्टपर्यत कोठडी

संजय राऊत यांना ८ आँगस्टपर्यत कोठडी

50
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220805-064653_Google.jpg

पुणे हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली; पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठारी सुनावली, त्यादरम्यान कोर्टात झालेली युक्तिवाद खालील प्रमाणे;ईडी च्या वकिलाने सांगितले की अवैध मार्गाने एक१ कोटी १७ लाखांचा व्यवहार झाला त्याबद्दल चौकशी केल्यास संजय राऊत या व्यवहाराबाबत माहिती देत नसल्याचा आरोप कोर्टात ईडी केला. ईडीने हे सांगितले की संजय राऊत यांच्या घरी महत्त्वाचे कागदपत्र मिळाले. राऊत यांच्या वडिलांनी सांगितले की संजय यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांना एसी चालत नाही शोषणाच्या त्रासामुळे एसी वापरत नाहीत त्यांना अशा ठिकाणी ठेवले गेले की ज्या ठिकाणी एसी आहे.ईडी सांगितले की त्यांना एसी मध्ये ठेवला आहे. यापुढे ते म्हणाले संजय राऊत यांना अशा ठिकाणी ठेवले जाते जिथे व्हेंटिलेशन नाही. किडीच्या वकिलाने सांगितले की रोख रकमेच्या तपशील त्यांच्या घरी मिळाला व त्यांच्या पत्नीच्या नावाने अनेक व्यवहार वळवले गेले हेही ईडीने कोर्टात सांगितले. संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावले असल्याने त्यांना जर जामीन मिळाला तर ते ईडीच्या कारवाईबद्दल अडचण निर्माण करतील म्हणून त्यांना जामीन मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे कोर्टाने संजय राऊत यांना आठ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचा घोटाळा प्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन बजावली आहे व उद्या सकाळी 11 वाजता त्यांना याबाबत विचारणा करण्यासाठी ईडी कार्यालयामध्ये बोलावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here