Home विदर्भ शहरी व ग्रामीण भागात दमदार पावसाची हजेरी..! पिकांना जीवनदान तर शेती कामाला...

शहरी व ग्रामीण भागात दमदार पावसाची हजेरी..! पिकांना जीवनदान तर शेती कामाला येणार वेग

97
0

राजेंद्र पाटील राऊत

शहरी व ग्रामीण भागात दमदार पावसाची हजेरी..!

पिकांना जीवनदान तर शेती कामाला येणार वेग

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे : युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ
मालेगाव शहरासह ग्रामीण भागात बारा ते पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली आहे 10 जुलै रोजी रात्रीच्या जोरदार सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या परिसरातील पिकांना जीवदान मिळाले असून पाळी, डवरणी ,खुरपणी, खते आणि राहिलेल्या पेरणी नंतरच्या आदी शेती कामाला वेग येणार आहे
सन 2021- 22 या वर्षाच्या खरीप हंगामामध्ये मृग नक्षत्रात कुठे पाऊस पडला तर कुठे नाही त्यामुळे यंदा पेरणीचे कामे मागेपुढे झाले आहे पाऊस मानाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर आदी पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या पण जूनच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने लांबणीवर पडत गेला परिसरात मागील बारा ते पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते मात्र 10 जुलै 2019 रोजी शहरी व ग्रामीण भागात गावखेड्यासह आधी परिसरातील गावात रात्री च्या सुमारास दमदार झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे त्याचबरोबर 11 जुलै रोजी वाशिम तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले पीक वाढीसाठी आणि मेहनती करिता वेळेवर पाऊस पाऊस पडला आहे असे जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून बोलल्या जात आहे

बॉक्स 1

सध्या दुबार पेरणीचे संकट दूर

यंदाच्या वर्षी पडलेल्या पावसामुळे पेरणी मागे पुढे झाली

असून

मागील दहा पेक्षा जास्त दिवसापासून खूप कोरड गेली आकाशात मोठी मोठी काळेभोर ढगाळे येत होती पण पाऊस होत नव्हता परंतु 9 जुलै नंतर वातावरण बदलून या झालेल्या पावसाने भविष्यातील शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचं या भागातील शेतकऱ्यांचेसंकट दूर करत पिकांना आता आधार दिला आहे सध्याच्या स्थितीत चांगला पाऊस पूर्ण हंगामात पुरेसा राहायला हवा असे प्रगतशील शेतकऱ्याकडून बोलले जातात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here