• Home
  • संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0110.jpg

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

शिवद्रोही राज्यपालांची हकालपट्टी करा:-अमोल काटे                                                                पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान कारक वक्तव्य केल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच भाजप प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असे बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांचा देखील यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोशाध्यक्ष अमोल काटे निषेध व्यक्त करतांना म्हणाले की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केलेली आहे. यापुर्वीही राज्यपालांनी समर्थ के बिना शिवाजी कौन पुछेंगा असे वक्तव्य करून छत्रपती शिवरायांचा अवमान केला होता. तसेच सावित्रीमाई व फुले महात्मा फुले यांच्या
बाबतीतही अवमान कारक वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यपाल हे शिवद्रोही असून वांरवार बहूजन महापुरुषांची बदनामी करत आहेत त्यामुळे राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यपालांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असे अमोल काटे म्हणाले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश हांडे प्रदेश संघटक अजय भोसले यांनी देखील अतीशय तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दक्षिण पुणे जिल्हा अध्यक्ष अजय सिंह सांवत उत्तर जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे पुणे शहर अध्यक्ष हर्षवर्धन मगदुम जिल्हा उपाध्यक्ष अशोक काकडे सचिव गणेश कुंजीर कार्याध्यक्ष अनिल माने हवेली तालुका प्रशांत नरवडे उपाध्यक्ष प्रशांत कुंजीर वैभव शिंदे रविंद्र पवार संजय शिरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment