Home पुणे कोयाळीच्या यात्रेत देव-दानव युद्धाचा थरार…

कोयाळीच्या यात्रेत देव-दानव युद्धाचा थरार…

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20221125-WA0001.jpg

कोयाळीच्या यात्रेत देव-दानव युद्धाचा थरार…             खेड,(मयुर चव्हाण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

श्री क्षेत्र कोयाळी भानोबाची (ता. खेड, जि. पुणे) येथे श्री भानोबाचा उत्सव व यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी देव-दानव युद्धाचा थरार अनुभवला.

पूर्वी शिवभक्त भानोबा देवाला कपट करून तस्करांनी मारले होते. एक दिवस माझ्यासाठी तुम्हाला मरावं लागेल, असा शाप त्यावेळी श्री भानोबा देवाने त्यांना दिला होता. त्यामुळे श्री भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आज ही देवाशी युद्ध करावे लागत असल्याचे येथे दिसून येत आहे.

दि. 24 नोव्हेंबर रोजी कोयाळी यात्रेच्या पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात श्री भानोबा (राहुटी ) मंदिरापासून देव-दानवांच्या युद्धाला सुरूवात झाली. भानोबा देव (जन्मस्थ) मंदिराकडे प्रस्थान करत असताना त्यांच्यासमोर मानवरुपी तस्कर दानवांनी आपली हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या.मात्र देवाच्या (देवाचा मुखवटावर घेतलेल्या ) नजरेला नजर पडल्यानंतर ते त्याक्षणी जमिनीवर कोसळतात. जन्मस्थ मंदिर परिसरापर्यंत हे युद्ध खेळले गेले. युद्ध खेळते वेळी जमिनीवर कोसळणाऱ्या सर्व तस्करांना येथील जन्मस्थ मंदिरासमोर उचलून आणून जमिनीवर रांगेत पालथे ठेवले जाते. त्यानंतर श्रीं भानोबाचा त्यांना स्पर्श दिला गेला. श्रींचे तीर्थजल त्यांच्यावर शिंपडले जाते. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाच्या नावानं चांगभलं असा भानोबाचा जयघोष करून त्यांना शुद्धीवर आणले.

दि.25 नोव्हेंबर रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा दुपारी बारा वाजता देव दानव युद्ध जन्मस्थ मंदिरा समोर खेळले जाणार आहे. कोयाळी श्री भानोबा उत्सव व यात्रा 3 दिवस चालते.पहिल्या व दुसऱ्या दिवशी देव-दानव युद्ध खेळले जाते. ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

Previous articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.
Next articleशहरातील मठा लगत असलेल्या मांस व मच्छी विक्रेत्यांना स्थलांतरित करा भाजपचे कौरवार यांच्या कडून मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here