• Home
  • ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन

ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0109.jpg

ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मौजा चकपिरंजी गावातील नागरिकांना तहसीलदारांकडून अतिक्रमण संदर्भात नोटीस देण्यात आले असून दि. 22/11/2022 पर्यंत अतिक्रमणधारकांनी अतिक्रम न हटवल्यास कारवाई करण्यात येईल असे संबंधित नोटीसमध्ये नमूद असल्याने संपूर्ण गावकरी धास्तावले असून गावात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवून नये याकरिता आज ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यात आला व तसे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी सौ. मनीषा चिमुरकर माजी सदस्या जि.प. चंद्रपूर चकपिरंजीचे सरपंच सौ. उषाताई गेडाम ग्रामपंचायत सदस्य अरविंद भैसारे ग्रामपंचायत सदस्य अमृत चौधरी मोतीराम चिमुरकर करणी स्वामी प्रभाकर चौधरी संजय मडावी रवी नन्नावरे मोहन भोपये सौ. वच्छलाबाई कोडापे संजय मेश्राम व असंख्य गावकरी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment