• Home
  • विज बिलाबाबत राज्य सरकार सकारात्मक, नामदार मुश्रीफ*

विज बिलाबाबत राज्य सरकार सकारात्मक, नामदार मुश्रीफ*

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201124-WA0013.jpg

*विज बिलाबाबत राज्य सरकार सकारात्मक, नामदार मुश्रीफ*

कोल्हापूर : आता राज्याची आर्थिक स्थिती काहीशी सुधारत आहे. घरगुती विज बिलाबाबत सवलत देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिली.
ना.हसन मुश्रीफ म्हणाले, शपथविधी झाल्यापासून गेल्या अकरा महिन्यांत राज्य शसनाने अत्यंत खडतर परिस्थितीत योग्य नियोजन करून कारभार केला आहे. कारोनामुळे महसुलात घट झाल्याने सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारासाठी ६४ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले. यातूनही सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी, अतिवृष्टीत मदतीचा हात दिला.
सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारासाठी दरमहा साडेबारा कोटी रुपये लागतात. कोरोनामुळे जीएसटी, पेट्रोल-डिझेलवरील सेस, मद्यविक्रीतून मिळणारा महसूल घटला. दरमहा फक्‍त तीन हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असताना शासनाने कोरोनाचा सामना केला. शेतकर्‍यांसह कष्टकरी समाजाला मदतीचा हात दिला. आता शासनाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेक सकारात्मक निर्णय होतील, असेही नामदार मुश्रीफ म्हणाले.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment