• Home
  • मालेगाव शहरातील नव्याने बसवलेल्या सिग्नल मुळे वाहतुक सुरळीत

मालेगाव शहरातील नव्याने बसवलेल्या सिग्नल मुळे वाहतुक सुरळीत

Anshuraj Patil

IMG-20201124-WA0053.jpg

मालेगाव शहरातील नव्याने बसवलेल्या सिग्नल मुळे वाहतुक सुरळीत

मालेगाव कँम्प : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव  शहरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नलमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन शिस्त लागण्यास मदत होईल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला , की शहरात नव्यानेच राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे वाहतूक व्यवस्थेवर सुरवातीला ताण पडेल. यातील अनुभवांनी पुढील काळात सुधारणा करता येतील. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक पोलिसांबरोबर नागरिकांवरदेखील मोठी जबाबदारी राहणार आहे.नाशिक शहरातील प्रमुख चौकातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी रिंग रोड प्रस्तावित करण्याच्या सूचना या वेळी दिल्या.
शहरात प्रमुख सात ते आठ मुख्य रस्ते असून, त्यावर महापालिकेने लक्ष केंद्रित करावे. या रस्त्यांचा विकास करून नागरिकांना भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहराच्या विकासासाठी शासनस्तरावरून भरीव निधी मंजूर करून २०२१ हे वर्ष मालेगावच्या विकासाचे वर्ष ठरेल, असा विश्‍वास भुसे यांनी व्यक्त केला.
विकास निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने विशेष तरतूद करण्याचे आवाहन नगरसेवक बोरसे यांनी प्रास्ताविकात केले. श्री. पाटील, श्री. बिडकर, शान-ए-हिंद, युनूस इसा यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक ॲड. गिरीश बोरसे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री भुसे बोलत होते. या वेळी उपमहापौर नीलेश आहेर, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद निहाल अहमद, माजी महापौर हाजी युनूस इसा, सखाराम घोडके, मुस्तकीम डिग्निटी, भीमा भडांगे, नंदकुमार सावंत, एजाज बेग, शफीक अन्सारी, दीपाली वारुळे आदी उपस्थित होते.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment