• Home
  • उमराणे येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 17 जणांचे स्कॅब अहवाल निगेटिव्ह प्रतिनिधी= किरण अहिरराव

उमराणे येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 17 जणांचे स्कॅब अहवाल निगेटिव्ह प्रतिनिधी= किरण अहिरराव

उमराणे येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 17 जणांचे स्कॅब अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी= किरण अहिरराव

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे या गावात 5 जुलै रोजी 60 वर्षीय महिला कारोना बाधित आढळून आल्याने त्यानंतर तिच्या संपर्कातील तिचा 70 वर्षीय पती तर 40 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर आरोग्य विभागाने त्या तिघा बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला दिनांक 8 जुलै रोजी म्हणजे बुधवारी त्यांच्या संपर्कातील 17 संशयितांचे घशाचे सराव तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आले होते त्यांचे अहवाल तालुका प्रशासनाला 9 जुलै रोजी प्राप्त झाले असून पूर्ण अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष मांडगे यांनी दिली आहे दरम्यान कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उमराणे गावाने 5 पाच दिवस जनता कर्फ्यू घोषित केला असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे नागरिकांनी घराबाहेर पडू नये वास्ता वापर करावा सोशल डिस्टंसिंग पालन करावे असे आव्हान ग्रामपालिका प्रशासनाने केले आहे

anews Banner

Leave A Comment