युवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 9 जुलै अमृता फडणवीस यांची सोशल मीडियावर उडवली पुन्हा एकदा खिल्ली फोटो लेते रहो या शब्दावरून सोशल मीडियावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सोशल मीडिया वरती खिल्ली उडवण्यात आली विशेष म्हणजे अमृता यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अमृता फडणवीस या कम्युनिटी हेल्थ सर्विस2019- 20 अंतर्गत वर्कशॉप मध्ये सहभागी झाल्या होत्या वेबिनार च्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला तसेच समाज उपयोगी आरोग्य उपक्रमाची गरज आणि परिणाम या विषयावर अमृता यांनी डॉक्टरांशी चर्चा केली दरम्यान अमृता यांनी सोशल मीडियावर या वेबिनार चे फोटो शेअर केले आहे त्यामधील एका फोटो वरून ट्रोल च्या निशाण्यावर आल्या आहेत अमृता फडणवीस या आरोग्याच्या संदर्भातील कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या यावेळी त्यांच्या टेबलवर एक कागद होता त्यावर तीन अक्षराचे एक वाक्य लिहिलं होतं या एका वाक्यावरून अमृता पुन्हा एकदा ट्रोलर्स च्या टीकेच्या धनी बनल्या आहेत फोटो ले तेरा हो या शब्दावरून सोशल मीडियावर अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत