Home कोल्हापूर कोल्हापूर शहर शिवसेना अपंग साह्य सेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर विविध मागण्यासाठी आंदोलन.

कोल्हापूर शहर शिवसेना अपंग साह्य सेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर विविध मागण्यासाठी आंदोलन.

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0036.jpg

कोल्हापूर शहर शिवसेना अपंग साह्य सेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर विविध मागण्यासाठी आंदोलन.
कोल्हापूर राहुल शिंदे : शहरातील दिव्यांग व्यक्तीच्या उदरनिर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक साह्य निधीत ५ टक्के वाढ करावी. यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी शिवसेना अपंग साह्य सेना यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोर आज आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन उपयुक्त रविकांत अडसुळ यांच्याकडे देण्यात आले.
. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी दिव्यांग बंधूंना अर्थसहाय्य दिलं जातं. या अनुदानात ५टक्के वाढ करावी. जेष्ठ बांधवांना साठ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांना पंधराशे रुपये अनुदान मिळावे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई हॉस्पिटल मध्ये सर्व दिव्यांग बांधवांना तसेच त्यांच्या कुटूंबाला मोफत उपचार मिळावे, शहरातील दिव्यांग बांधवांच्या जुन्या घरांच्या पडझडीसाठी राखीव निधी ठेवावा. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दिव्यांग भवन व्हावे, अशा विविध मागणीसाठी कोल्हापूर शहर शिवसेना सेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. या मागणीचे निवेदन उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे देण्यात आले.
. यावेळी अध्यक्ष अनिल मिरजे, गोपीनाथ डवरी, राजेंद्र झाड, मोहन घोडके, विठ्ठल शिंदे, विजय जोगदी यांच्यासह शिवसेना अपंग सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here