Home परभणी भारतीय खाद्य निगम यंत्रणा ही अखंड देशासाठी संजीवनी, ठरली असल्याची माहिती आमदार...

भारतीय खाद्य निगम यंत्रणा ही अखंड देशासाठी संजीवनी, ठरली असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डिकर यांनी दिली.

37
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतीय खाद्य निगम यंत्रणा ही अखंड देशासाठी संजीवनी, ठरली असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डिकर यांनी दिली.

युवा मराठा न्युज :-शत्रुघ्न काकडे पाटील
जिंतूर (परभणी):-शहरातील माऊली मंगल कार्यालयात आयोजित ‘भारत की आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत ‘खाद्य योजना का उत्सव’ कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी आंचल गोयल, आमदार मेघना बोर्डिकर, डीएसओ सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार सखाराम मांडवगढे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, लक्ष्मण बुधवंत यांची उपस्थिती होती.
जगातील भारत हा एकमेव असा देश आहे की 132 कोटी जनसंख्या असलेल्या 100 कोटी लोकांना खाद्य निगम यंत्रनेच्या माध्यमातुन अन्नधान्य पुरवठा केला जातो. 1960 पासून स्थापन झालेली ही यंत्रणा आजपावेतो सक्षमपणे आपले कार्य करत आहे. देशात जरी 2 वर्ष दुष्काळ पडला तर सर्व देशातील नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करू शकते अशी सक्षम यंत्रणा म्हणजे भारतीय खाद्य निगम आहे, असे महत्व आमदार बोर्डिकर यांनी विषद केले.
अमृत महोत्सव साजरा करताना देशवाशियांना ही माहिती असणे गरजेचे आहे. दूरदृष्टि ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजु शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये महीना अनुदान दिले जात आहे. तसेच 132 कोटी जनसंख्या असलेल्या देशात प्रभाविपणे लसीकरण केंद्र सरकारने राबवील्यामुळे आपण एकत्र येथे बसलो आहोत. शेजारील गरजू देशास सुद्धा आपण कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचा पुरावठा पंतप्रधानांनी करून शेजारधर्म पाळला. तसेच कोरोना काळात रोजगार बुडाल्यामुळे कोणी उपाशीपोटी राहु नये म्हणून याच खाद्य निगम योजनेच्या माध्यमातुन सुरळीत यंत्रणा राबवत गरजूंपर्यंत अन्नधान्य पुरविले. ज्यात दुर्गमभाग, डोंगराळ प्रदेश किंवा बेट असेल अश्या सर्व भागात अन्नधान्याचा पुरवठा या खाद्य निगमच्या माध्यमातून सुरळीत सुरु असल्याची माहितीही आ. बोर्डिकर यांनी दिली. किसान अनुदान खात्याची केवायसी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी उपविभागिय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार सखाराम मांडवगडे,डीएसओ सुशांत शिंदे तसेच खाद्य निगमचे मराठवाड़ा प्रबंधक राजेश जनबंधु यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता शिंदे यांनी केले तर आभार राठोड यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रामसेवक, तलाठी, महसूल अधिकारी, कर्मचारी, राशन दुकानदारांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here