Home सोलापूर बार्शी तालुक्यातील पुनर्वसित तांदुळवाडी व महागांवला जिल्हा पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार व संबंधित...

बार्शी तालुक्यातील पुनर्वसित तांदुळवाडी व महागांवला जिल्हा पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष भेट दिली.

31
0

राजेंद्र पाटील राऊत

बार्शी तालुक्यातील पुनर्वसित तांदुळवाडी व महागांवला जिल्हा पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष भेट दिली.

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

बार्शी तालुक्यातील पुनर्वसित महागांव व तांदुळवाडी या गांवच्या प्रलंबित व अपूर्ण नागरी सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी २५ एप्रिल रोजी मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात प्रांत अधिकारी हेमंत निकम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार सुनील शेरखाने व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती.

सदर बैठकीत प्रलंबित व अपूर्ण पुनर्वसित सोयी सुविधांची कामे सुरू करण्यासाठी प्रशासकीय व गावपातळीवरील अडचणी सामंजस्यपणे दूर करून त्या कामांना गती देण्यासाठी, बुधवार दि. २७ एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत या पुनर्वसित गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरले होते.

त्या अनुषंगाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोणपे साहेब, तहसीलदार सुनील शेरखाने साहेब, भूमापन अधिकारी नरेंद्र झांबरे, लघू पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.एस.शिंदे यांच्या समवेत पुनर्वसित तांदुळवाडी व महागांव या गावांस प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणच्या अपूर्ण व प्रलंबित नागरी सोयी सुविधांची माहिती घेऊन, त्यांची पूर्तता करण्यासाठी लवकरच मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे बैठक आयोजित करण्याचे ठरले आहे.

यावेळी तांदुळवाडी व महागांवचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here