Home गुन्हेगारी पी.आय.लांडगेच्या देवळ्यात कोल्ह्याकुत्र्याची कोल्हेकुई…! वडनेर भैरवच्या नाग्या गोप्याच्या सट्टा अडुड्याची धुमच लई…!!

पी.आय.लांडगेच्या देवळ्यात कोल्ह्याकुत्र्याची कोल्हेकुई…! वडनेर भैरवच्या नाग्या गोप्याच्या सट्टा अडुड्याची धुमच लई…!!

34
0

राजेंद्र पाटील राऊत

पी.आय.लांडगेच्या देवळ्यात कोल्ह्याकुत्र्याची कोल्हेकुई…!
वडनेर भैरवच्या नाग्या गोप्याच्या
सट्टा अडुड्याची धुमच लई…!!

(राजेंद्र पाटील राऊत)
देवळा,दि.३०- ज्या जुगारामुळे महाभारत घडले.पांडवाना जुगारात सर्वस्व हरावे लागले.अक्षरशः द्रौपदीला देखील जुगारात गमवावे लागले अशा भयानक जुगाराचा प्रकार सट्टा मटका नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यात रतन खत्रीची पिल्लावळ अर्थातच वडनेर भैरवचा नाग्या गोप्या स्थानिक काक्याच्या मदतीवर राजरोसपणे चालवित असून,त्यामुळे देवळा तालुक्याची प्रतिमा या अवैध व बेकायदेशीर व्यवसायामुळे खराब होत चालली आहे.
देवळा सटाणा रोडवरील माळवाडी गावालगत असलेल्या एका ताडी दुकानाशेजारी हा नाग्या गोप्याचा सट्टा मटका अड्डा बिनदिक्कतपणे सुरु आहे.या अवैध व्यवसायाला आशिर्वाद व अभय कुणाचा? तर पोलिस प्रशासनाने डोळेझाक केली आणि राजकारणात अग्रेसर असलेल्या या तालुक्याच्या पुढाऱ्यांनी नाग्या गोप्याच्या या अवैध धंद्याकडे व तरुण पिढीला वाममार्गाला लावणाऱ्या व्यवसायाकडे साफ दुर्लक्ष केल्याने तरुण पिढी उध्वस्त होऊन बरबाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.वास्तविक नाग्या गोप्याच्या या सट्टा मटका अड्ड्यापासून अवघ्या काही मिनटाच्या अंतरावर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या नामांकीत शिक्षण संस्था असून,तेथील येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यावर या जुगाराचा काय परिणाम होईल याची कल्पना न केलेलीच बरी! देवळा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे या प्रकरणात मात्र बघ्याची भुमिका घेऊन का मौन बाळगून आहेत हे एक न उलगडलेले कोडे आहे.परकीय तालुक्यातून म्हणजे चांदवडच्या वडनेर भैरवमधून देवळा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर सट्टा मटका धंद्याचा उच्छाद मांडणा-या नाग्या गोप्याला पाठीशी घालून त्याचे कोडकौतुक करणारा हा काक्या नेमका आहे तरी कोण? गोरगरीबांच्या संसारात माती कालविण्याचे महापाप करणाऱ्या या माफीयांना पोलिस प्रशासन का जेरबंद करु शकत नाही,असा सवाल उपस्थित होत असला तरी आता या देवळ्यातील कोल्हेकुई करुन धुम गाजविणा-या सट्टा माफीयांच्या विरोधात थेट नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांचेकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असून जनहितार्थ राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ या अवैध धंद्याचा समूळ बिमोड करण्यासाठी तत्पर झाला आहे.
उद्या वाचा👉लांडगेच्या कळपात सट्टा माफीया नाग्या गोप्याचा सुळसुळाट!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here