Home बुलढाणा संग्रामपूरचे बिडिओ व चार ग्रामसेवक यांचे विरुद्ध ओली पार्टी व उपोषणकर्त्यास पेटवून...

संग्रामपूरचे बिडिओ व चार ग्रामसेवक यांचे विरुद्ध ओली पार्टी व उपोषणकर्त्यास पेटवून देईन च्या धमकी प्रकारनी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण..! मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार / निवेदन:

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0010.jpg

संग्रामपूरचे बिडिओ व चार ग्रामसेवक यांचे विरुद्ध ओली पार्टी व उपोषणकर्त्यास पेटवून देईन च्या धमकी प्रकारनी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण..!
मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार / निवेदन:

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

बुलढाणा:-संग्रामपूर पंचायत समितीचे नेहमी गोरगरीब नागरिकांवर हुकूमशाही करणारे व नागरिकांना दमदाटी करून 353 सारख्या केसची धमकी देणारे आणि कार्यालयीन वेळेत मध्य प्राशन करण्यात नावलौकिक असलेले यां ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेले असे अधिकारी कोण तर संग्रामपूरचे गटविकास अधिकारी एस एम पाटील हेच नाव प्रामुख्याने समोर येते. सविस्तर वृत्त असे की दिनांक 1 ऑगस्ट २०२२ रोजी कोद्री येथील श्रीराम पाटील खोंड (अपंग ज्येष्ठ नागरिक) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे तक्रार/निवेदन दिले असून त्यात असे नमूद आहे की जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संग्रामपूर पंचायत समितीचे बिडिओ व चार ग्रामसेवकांसह ओली पार्टी करणाऱ्या बिडिओ विरुद्ध सात दिवसाचे आत कार्यवाही न केल्यास दिनांक 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद समोर एक तासाचे लाक्षणीक उपोषण करून त्यानंतर लगेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. कारण कायद्याद्वारे असलेल्या सत्याग्रहाचा अधिकार व उपोषणाचा संविधानिक मार्ग अवलंबून मोजे कोद्री येथील सहकारी, नागरिकांसह उपोषणास बसेल. असे निवेदनात नमूद असून याआधी ग्रामपंचायत कोद्री येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल प्रपत्र (ड) मधील पात्र व अपात्रतेची यादी ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनी तयार करून चिरीमिरी करून काही चुकीचे लाभार्थी निवडून योग्य व गरजू 41 लोकांचे प्रपत्र (ड)मधुन नाव वगळण्यात आले त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत समिती यांचे कडून बनावटी व शासनाची दिशाभूल करणारे कामे थांबवून गावकऱ्यांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी पंचायत समिती समोर 14 मार्च 2022 रोजी आमरण उपोषणाचे निवेदन कोद्री येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी संजय पाटील यांना दिले होते. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने निवेदनात दिल्याप्रमाणे श्रीराम खोंड व इतर नागरिक हे 21 मार्च 2022 रोजी पंचायत समिती येथे उपोषणास बसण्यास आले असता बिडिओ यांच्या कार्यालयात भेटीअंती बिडिओ संजय पाटील यांनी श्रीराम खोंड यांना उपोषणास बसल्यास पेटवून देईल असे धमकावले व सर्वांसमोर अपमानित केले त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या बिडिओ यांच्या वागणुकीला घाबरून उपोषण करते आल्या पावली परत गेले. त्यावर खोंड यांनी दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी बिडिओ संजय पाटील यांचे विरोधात घडल्या प्रकाराबाबत पोलीस स्टेशन तामगाव येथे फिर्याद दिली परंतु बिडिओ यांचे “हात फार लंबे” त्यामुळे अद्यापही बिडिओ यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही परंतु घटनेतील साक्षीदार नंदु उर्फ पुंडलिक खांनझोड यांचे वर दबाव आणण्यासाठी बिडिओ यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोस्टे तामगाव येथील कर्तव्यदक्ष? अधिकाऱ्यांनी लगेच 353 सारखा गुन्हा खानझोड विरुद्ध दाखल सुद्धा केला आहे. आणि आश्चर्याचे म्हणजे याआधी जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीला बिडिओ असताना संजय पाटील यांना नियमित अनुपस्थित राहणे कार्यालयात आल्यास मद्यप्राशन करून येणे अशा कारणाने शासनाने निलंबित सुद्धा केले होते. आणि सद्यस्थितीत संग्रामपूर येथे कार्यरत असतांना दिनांक 12 जुलै 2022 रोजी बिडिओ संजय पाटील व चार ग्रामसेवक यांचा होली पार्टी करतानांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता परंतु त्यावर सुद्धा अद्यापही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. कारण उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद बुलढाणा येथून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू असल्याच्या चर्चेला तालुक्यात उदान आले आहे.म्हणुन त्यांच्यावर कारवाई करिता खोंड यांनी गटविकास अधिकारी व चार ग्रामसेवक यांचे निलंबन करून गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रार/ निवेदनाद्वारे दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे दिलेल्या उपोषणाच्या निवेदनात श्रीराम खोंड यांनी म्हटले असुन निवेदनाच्या प्रती खासदार साहेब बुलढाणा, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, व शहर पोलीस स्टेशन बुलढाणा यांना देण्यात आल्या त्यावर कारवाई होते की पाणी कुठे मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here