Home परभणी जिंतूर शहरात विद्युत तार तुटून युवक गंभीर जखमी

जिंतूर शहरात विद्युत तार तुटून युवक गंभीर जखमी

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0011.jpg

जिंतूर शहरात विद्युत तार तुटून युवक गंभीर जखमी

शत्रुघ्न काकडे पाटील-ब्युरो चिफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर शहरातील पठाण मोहल्ला परिसरातील विद्युत प्रवाह असलेला तार तुटून 18 वर्षीय शेखर चव्हाण या युवकाच्या अंगावर कोसळून तो गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना रविवार 10 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर युवकाला विजेचा तीव्र झटका बसल्याने युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.
शहरातील पठाण मोहल्ला परिसरात महावितरणच्या भोंगळ व नियोजनशून्य कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून सर्वच विद्युत तारा प्रचंड प्रमाणात लोंबकळत आहे. त्यातच रविवारी शेखर चव्हाण हा दुचाकीवरून पठाण मोहल्ला परिसरातून जात असताना अचानक विद्युत प्रवाह असलेला तार अंगावर कोसळल्याने तो दुचाकीवरून जमिनीवर पडला. मात्र त्याच्या हातात विद्युत तार अडकल्याने त्याला काही क्षण विजेचे तीव्र झटके बसले.हा प्रकार परिसरातील सय्यद अबुजर यांनी बघितल्यानंतर त्यांनी लाकड्याच्या साह्याने तारापासून युवकाला बाजूला काढले. पण या घटनेत अपघातग्रस्त युवकाचा खांदा तसेच दोन्ही हात गंभीर भाजले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी दुचाकीवर युवकास उपचारार्थ दाखल केले. परंतु या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here