Home कोल्हापूर कोल्हापूरात उच्चशिक्षित डाँक्टर तरुणीची इंजेक्शन घेऊन आत्महत्या

कोल्हापूरात उच्चशिक्षित डाँक्टर तरुणीची इंजेक्शन घेऊन आत्महत्या

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0016.jpg

कोल्हापूर,( राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):कोल्हापूर मधील उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीने भूलीच्या इंजेक्शनचा अतिरिक्त मात्रा घेऊन आत्महत्या केली.अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय 30 राहणार ताराबाई पार्क) असे मृत तरुणीचे नाव आहे या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.याबाबत अधिक माहिती अशी की सुप्रसिद्ध डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे यांची मुलगी अपूर्वा या एम एस चे शिक्षण घेऊन सध्या डी वाय पाटील महाविद्यालय मध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत होत्या शनिवारी रात्री त्यांच्या मित्रांची पार्टी होती पार्टी आटोपून एक वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घराच्या बाहेर पडल्या सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ताराबाई पार्क येथील डी मार्ट च्या समोर एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.तेथील नागरिकांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन यांना घटनेची माहिती दिली.याच दरम्यान डॉक्टर प्रविणचंद्र हेंद्रे हे मुलगी बेपत्ताझाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले होते पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले हे पथकास समवेत डॉक्टर केंद्रे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सदरची तरुणी अपूर्वा असल्याचे सांगितले.पोलिसांनी तात्काळ तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.त्या तरुणीच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

Previous articleजिंतूर शहरात विद्युत तार तुटून युवक गंभीर जखमी
Next articleपेरमिली नाल्यावरुन ट्रॅक वाहून गेला तीन म्रुतदेह सापडले माहिती मिळतच जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी दाखल झाले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here