Home गडचिरोली पेरमिली नाल्यावरुन ट्रॅक वाहून गेला तीन म्रुतदेह सापडले माहिती मिळतच जि.प.माजी अध्यक्ष...

पेरमिली नाल्यावरुन ट्रॅक वाहून गेला तीन म्रुतदेह सापडले माहिती मिळतच जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी दाखल झाले.

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0025.jpg

पेरमिली नाल्यावरुन ट्रॅक वाहून गेला तीन म्रुतदेह सापडले

माहिती मिळतच जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी दाखल झाले.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- तालुक्यांतील भामरागड मार्गावरील पेरमिली जवळ असलेल्या नाल्यात ५ ते ६ प्रवासी असणार एक ट्रॅक नाल्यावरून काल रात्री अंदाजे ९:३० ते १०:०० च्या सुमारास वाहून गेल्याची माहिती रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झाली होती.सकाळी अहेरीचे तहसीलदार श्री.ओंतारी साहेब,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी दाखल झाले तसेच एसडीआरएफ पथक व महसूस कर्मचारी यांनी शोधमोहीम राबविन्यात आले असून सदर ट्रॅक मध्ये तीन शव मिळाले असून अहेरी तालुक्यांतील कसमपली येतील सीताराम बिचू तलांडी,व त्यांची पत्नी समी सीताराम तलांडी असल्याचं समजते तर दुसरी एक महिलाच्या नाव पुष्पा नामदेव गावडे असून भामरागड तालुक्यातील मोकेला गावातील असल्याचं समजले असून सदर तिन्ही शव उपजिल्हा रुग्णालय अहेरी येते शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले.
सदर घटनास्थळी तहसीलदार श्री.ओंतारी साहेब,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,पेरमिलीचे सरपंचा सौ.किरणताई कोरेत,मेडपलीचे सरपंच श्री.निलेश वेलादी,पेरमिलीचे माजी सरपंच श्री.प्रमोद आत्राम,नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार व एसडीआरएफ चे व महसूस कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleकोल्हापूरात उच्चशिक्षित डाँक्टर तरुणीची इंजेक्शन घेऊन आत्महत्या
Next articleजोरदार पाऊसात वासखेडी नगरीत भक्तिमय वातावरणातुन दुमदुमला विठ्ठ्ल नामाचा गजर,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here