Home उतर महाराष्ट्र जोरदार पाऊसात वासखेडी नगरीत भक्तिमय वातावरणातुन दुमदुमला विठ्ठ्ल नामाचा गजर,

जोरदार पाऊसात वासखेडी नगरीत भक्तिमय वातावरणातुन दुमदुमला विठ्ठ्ल नामाचा गजर,

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0023.jpg

जोरदार पाऊसात वासखेडी नगरीत भक्तिमय वातावरणातुन दुमदुमला विठ्ठ्ल नामाचा गजर,

वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क – येथील सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीला माऊलींची पालखीची मिरवणुक मोठ्या भक्तिभावाने काढण्यांत आली या वर्षी वरूण राजाने चांगली कृपा केली व शेतकरी राजा आनंदीत झाला ही विठ्ठलाचीच कृपा म्हणावी असे हरिभक्त म्हणतात ,पालखीला गावातील विठ्ठ्ल मंदीरापासुन सुरूवात करण्यांत आली ,मोठ्या भक्तिभावाने माऊलींची पालखी टाळ, मृदंगाच्या गजरात निघाली, विठ्ठलाची दिंडी भर पाऊसात हरी नामाचा गजर करत उत्साहात सुरू झाली,
पालखीतून विठ्ठल रूख्मिनिचा पादुका घेऊन विठ्ठल भक्त वारकरी आपले हरीचे गणवेष परीधान करून ,हातात टाळ,मृदंग,हाती घेऊन महीला व तरूणींनी न ऊवारी साडीचा पेहराव करून डोक्यावर तुळशिची वृंदावन घेऊन निघालेली विठ्ठलाची स्वारी जणु साक्षात विठ्ठल अवतरल्याची विसंगत दृष्य या प्रसंगी दिसत होती,भजनाचा गजर बघता ‘माझे माहेर पंढरपुरी आहे भिम नदीच्या तिरी ‘ अशा अभंगरूपी वातावरणाचा तो देखावा होता,शाळेतील चिमुकल्यांनी देखील यावेळी आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदविला,प्रसंगी अभंग ,भारूडातून जीवंत हरी दर्शन यावेळी गावकर्यांनी अनुभवले,पालखीचे दृश्यं बघुन मन अगदी भारावुन निघाले,विठ्ठलांच्या जय घोषाने आणि संत जनाबाईंच्या ओवींनी व संत कबीर,संत नामदेवांच्या अभंगांचा अस्वाद घेत वासखेडीला जसे पंढरपुराचे दर्शन घडवितांना हरी भक्तांनी अनमोल ठेवा आपल्या लाडक्या विठुरायाचा नामाचा उच्चार अखंड संतांच्या भुमित आषाढी रूपी साजरा केला ,या भक्तीमय पालखी सोहळ्या प्रसंगी सप्तपाताळेश्वर महादेव मंदीराकडुन मुख्य रस्त्यावरून विठ्ठल मंदीराजवळ फुगडी खेळुन समारोप करण्यांत आला, भक्तीमय पालखी सोहळ्या प्रसंगी सप्तपाताळेश्वर भजनी मंडळाचे, ह.भ.प.छोटुलाल कुवर,भास्कर नाना ठाकरे,यादवराव कुवर,अमृत कुवर,वसंतनाना कुवर,ज्येष्ठ माऊली दंगल आप्पा मुजगे,आत्माराम सुर्यवंशी, अमृत मुजगे,परशुराम गवळे,दादाजी कुवर,दादाजी नेरकर,शांताराम कुवर,भाऊसाहेब दहीते, नानाभाऊ कुवर, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव,तसेच तरूण भजनी मंडळाचे ह.भ.प.उमेश माऊली नेरकर,दिव्यांग पखवाल वादक विनायक नांद्रे,चंद्रकांत कुवर ,मुरलीधर नेरकर,मधुकर जाधव ,राजेंद्र मुजगे,योगेश कुवर,भारत शेवाळे,वैभव सुर्यवंशी, अविनाश देवरे,सचिन देवरे,राजेश खारकर,महेंद्र कुवर,जितेंद्र गांगुर्डे,कुणाल कुवर,सागर कुवर,गोपाल मुजगे ,गिरीष जाधव,शशीकांत वाघ तसेच महिला मंडळाचे ह.भ.प.मालतीबाई नेरकर,रेखाबाई कुवर,मनिषामाई, मंगलाबाई जाधव,सौ मुजगे,व तरूणी मोठ्या संखेने उपस्थित होते,

Previous articleपेरमिली नाल्यावरुन ट्रॅक वाहून गेला तीन म्रुतदेह सापडले माहिती मिळतच जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी दाखल झाले.
Next article‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविताना नियमांचे पालन करावे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here