Home Breaking News तैवानवर युध्दाचे ढग?

तैवानवर युध्दाचे ढग?

137

आशाताई बच्छाव

Screenshot_20220803-063347_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे. तैवान वरती युद्धाचे ढग? तैवान आणि चीन यांचे संबंध फारसे चांगले नाहीत त्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रीय प्रवक्ते नेन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा हा चितावणीखोर आहे. कारण चेन्नई स्पष्टपणे ठणकावून सांगितले होते की अमेरिकेचे राष्ट्रीय प्रवक्ते पेलोशी यांनी तैवान दौरा करू नये.पेलोसी यांनी तैवान दौरा केल्यास तेथील तैवान विमानतळ बॉम्ब हल्ल्याने उडवून टाकू अशी धमकी चीन सरकारनं दिली होती. त्या धमकीला न जुमानता अमेरिकेचे प्रवक्ते यांनी साहेबांचा दौरा केला व त्यांचे विमान तैपई या विमानतळावरती दाखल झाले. त्या दरम्यान अमेरिकेचा विरोध करण्यासाठी चीने आपले सैन्य दलाचे शक्ती प्रदर्शन केले. चीनचे राष्ट्रपतींनी सांगितले की अमेरिकेने विश्वासघात केला. व त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे तैवांच्या मुद्द्यावरून चीन व अमेरिका यांच्यामध्ये तणाव वाढत चालला आहे हे नक्की, व युक्रेन नंतर तैवान वरती युद्धाचे सावट आहे हे चीनने जाहीरपणे सांगितले. तैवानला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे चिन ने सांगितले. या दौऱ्या दरम्यान पेलोसी नी सांगितले की आमचा तैवानला कायमचा पाठिंबा राहील तैवाने घाबरण्याचे काही कारण नाही. तैवानचे व चीनचे संबंध पाहता युद्ध होईल असे अनेक तज्ञांना वाटते.