आशाताई बच्छाव
बोईसर येथे रानभाजी महोत्सव उत्साहात पार पालघर,(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज बोईसर डॉन बॉस्को स्कूल येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुढच्या पिढीला हे ज्ञान मिळावे,वनस्पतींची माहिती व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,एकूण 103 रानभाज्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.तसेच नागली च्या भाकरीचा स्टॉल ही खवय्यांसाठी उपलब्ध होता. अध्यक्ष नंदकुमार पाटील व सामाजिक कार्यकर्ते डेरल डिमेलो सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे व मंडळ अध्यक्ष जितेंद्र संखे यांच्या संकल्पनेने हा कार्यक्रम पार पडला विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावली येथील कणसरी महिला बचत गटाने या रानभाज्या प्रदर्शनासाठी आणल्या होत्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आदि पदाधिकारी उपस्थित होते तर या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शन पाहिलेला कार्यक्रम यशस्वी यांनी प्रयत्न केले.