Home गडचिरोली शिवकल्याण संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताह मोठया उत्साहात साजरा.

शिवकल्याण संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताह मोठया उत्साहात साजरा.

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220705-WA0023.jpg

शिवकल्याण संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताह मोठया उत्साहात साजरा.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)// सद्या स्थितीत मानव आणि वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. ते रोखले पाहिजे म्हणून दरवर्षी 1 ते 7 जुलै दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोशीएशन च्या वतीने चामोर्शी तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा वालसरा येथे वन्यजीव सप्ताह साजरा करून विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे मानवी आयुष्यातील महत्व या संदर्भात माहिती देण्यात आली. विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असून विद्यार्थ्यांवर योग्य वेळी योग्य संस्कार होणे काळाची गरज आहे हेच उद्देश पुढे ठेऊन शिवकल्याण संस्थेच्यावतीने नेहमी विद्यार्थी घडविण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नेहमी सांगितले जाते जेथे झाडे झुडे तेथे पाऊस पडे, पण झाडे आणि जंगले टिकवून ठेवायचे असेल तर वन्यजीवांचे अस्तित्व टिकवून देखील तितकेच महत्वाचे आहे असे प्रतिपादन शिवकल्याण संस्थेचे अध्यक्ष अनुप कोहळे यांनी केले ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी वालसरा ग्रामपंचायत चे सरपंच अरुण मडावी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र वासेकर, प्रा. गायकवाड, प्रा. वडेट्टीवार, शिवकल्याण संस्थेचे सदस्य जितेश शेट्टीवार, नीरज कोहळे, गणराज चीचघरे, प्रतिष्ठित नागरिक रितेश कुकडकर सह मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी मोठया अवडणीने वन्यजीवांचे मानवी आयुष्यातील महत्व समजून घेतले. उपस्थित विद्यार्थ्यांना शिवकल्याण संस्थेच्या व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  नोटबुक चे देखील वितरण करण्यात आले.

Previous articleभारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी हे थोर विचारक
Next articleयुवा मराठा न्युजचा दणका व-हाणेतील सट्टा अड्डा बंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here