Home गुन्हेगारी युवा मराठा न्युजचा दणका व-हाणेतील सट्टा अड्डा बंद

युवा मराठा न्युजचा दणका व-हाणेतील सट्टा अड्डा बंद

158

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220706-140948_Google.jpg

युवा मराठा न्युजचा दणका
व-हाणेतील सट्टा अड्डा बंद
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-परवा बुधवारी व-हाणे ता.मालेगांव येथील कै.तुकाराम भाऊ पवार नगरात सुरु असलेल्या सट्टा मटका जुगार अड्डयाची बातमी युवा मराठा न्युज आँनलाईनवर प्रसारीत होताच सदरचा जुगार अड्डा काल गुरुवार दि.७ पासून तडकाफडकी बंद करण्यात आल्याची माहिती व-हाणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र तुकाराम पवार यांनी युवा मराठा न्युजला दिली.
गावातील युवा वर्गाचे होणारे संभाव्य नुकसान व भावी पिढी वाममार्गाला जाण्याची शक्यता गृहीत धरुन हा सट्टा मटका अड्डा बंद करण्याची सक्त ताकीद सट्टा माफीयाला नागरिकांच्या उपस्थितीत देऊन हा अड्डा कालपासून बंद केल्याचे पवार यांनी सांगतानाच,युवा मराठाच्या बातमीचे अभिनंदन केले व निर्भिड पत्रकारितेचा दमदार आवाज म्हणजे खरोखरच युवा मराठा असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

Previous articleशिवकल्याण संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताह मोठया उत्साहात साजरा.
Next articleसंजय राऊत हाजिर हो.! कलम ४९९, ५०० अंतर्गत अटक वॉरंट जारी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.