Home मुंबई संजय राऊत हाजिर हो.! कलम ४९९, ५०० अंतर्गत अटक वॉरंट जारी..

संजय राऊत हाजिर हो.! कलम ४९९, ५०० अंतर्गत अटक वॉरंट जारी..

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0030.jpg

संजय राऊत हाजिर हो.! कलम ४९९, ५०० अंतर्गत अटक वॉरंट जारी..

मुंबई (जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

मेधा किरीट सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी वॉरंट जारी केले )
मेधा किरीट सोमय्या मानहानी प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी आज अटक वॉरंट जारी केले आहे. याबाबतची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. भारतीय दंडविधानातील कलम ४९९, ५०० अंतर्गत हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
शिवडी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात आज जामीनपात्र अटक वॉटंर जारी केले आहे. त्याबद्दलची शिवडी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात आज जामीनपात्र अटक वॉटंर जारी केले आहे. त्याबद्दलची माहिती सोमय्या यांनी आपल्या ट्वीट दिली आहे. या अटक वॉरंटमध्ये न्यायालयाने राऊत यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी न्यायालयाने मेधा यांच्या तक्रारीची दखल घेत राऊत यांना समन्स बजावून सोमवारी (४ जुलै) हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावून १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांची माफी मागावी असे सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता. मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.

Previous articleयुवा मराठा न्युजचा दणका व-हाणेतील सट्टा अड्डा बंद
Next articleबार्शी येथे भुयारी गतरी योजनेसाठी* *शासनाने ११२.४० कोटी रुपये मंजूर केले. आ.राजेंद्र राऊत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here