Home सोलापूर बार्शी येथे भुयारी गतरी योजनेसाठी* *शासनाने ११२.४० कोटी रुपये मंजूर केले. आ.राजेंद्र...

बार्शी येथे भुयारी गतरी योजनेसाठी* *शासनाने ११२.४० कोटी रुपये मंजूर केले. आ.राजेंद्र राऊत

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0029.jpg

बार्शी येथे भुयारी गतरी योजनेसाठी* *शासनाने ११२.४० कोटी रुपये मंजूर केले.
आ.राजेंद्र राऊत

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ ब्युरो महादेव घोलप.

बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून, बार्शी शहरासाठी ११२.४० कोटी रुपयांचा भुयारी गटार योजनेचा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी शासनाने ११२.४० कोटी रुपये मंजूर केले होते. या योजनेमध्ये १८.५ दशलक्ष लिटरचे मल शुद्धीकरण केंद्र, उपळाई रोड शेंडगे प्लॉट येथे झोन १ चे पंपगृह, अंबराई नाला येथे झोन ३ साठीचे पंपगृह व मलशुद्धीकरण केंद्र येथे झोन २ चे पंपगृह उभारण्यात आले आहे.

तसेच या योजनेद्वारे बार्शी शहरामध्ये १२२ किलोमीटर मल निस्सारण वाहिनी टाकण्याचा समावेश होता. सदरची सर्व कामे पूर्ण झाली असून, मल शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात बार्शी नगर परिषदेची सर्वात उशिरा मंजूर झालेली व सर्वात अगोदर कार्यान्वित होणारी ही योजना प्रथम ठरली आहे. सदर योजनेची चाचणी घेण्यात आली असून, या संपूर्ण योजनेची पाहणी व मलशुद्धीकरण केंद्र प्रक्रिया होणाऱ्या पाण्याची तपासणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केली.असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

Previous articleसंजय राऊत हाजिर हो.! कलम ४९९, ५०० अंतर्गत अटक वॉरंट जारी..
Next articleगडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा सौ.योगीताताई पिंपरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here