Home मुंबई पत्ते पे पत्ता ,शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची बंडखोरी पाहुन थोपला प्लान

पत्ते पे पत्ता ,शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची बंडखोरी पाहुन थोपला प्लान

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0056.jpg

पत्ते पे पत्ता ,शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची बंडखोरी पाहुन थोपला प्लान                               मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे ज्या महाशक्तीचा उल्लेख करत होते, ती भाजपाच तर आहे, दुसरी कोणती शक्ती आहे? असा सवाल करत त्यांना सत्ता परिवर्तन करायचे आहे, यामुळे ते हे प्रकार करत असल्याची टीका पवारांनी केली आहे.

याचबरोबर मी राज्यातील चर्चेसाठी दिल्लीत आलेलो नाही, तर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी अर्जासाठी आलो आहे, असे पवार म्हणाले. शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांनी नव्या युतीबाबत चर्चा केली आहे. परंतू आम्हाला शिवसेनेने भेटून सरकारला पाठबळ असल्याचे सांगितले आहे, यामुळे आमचा त्यांना पाठिंबा आहे. तोच कायम ठेवायचा आहे, असेही पवार म्हणाले.

तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत कोण बोलले माहिती नाही, परंतू राष्ट्रपती राजवट लागली तर शिंदेंच्याच प्रयत्नांवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागली तर सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील, असा इशारा पवार यांनी दिला आहे. गेल्या अडीच वर्षांत त्यांना त्रास झाला नाही, राष्ट्रवादीने त्रास दिल्याचे आताच कसे बाहेर आले, असा सवालही पवार यांनी केला. आमच्या आघाडीकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे काही मागण्या केल्या जातील. त्यात कठोर कारवाई करण्याबाबत पाऊले उचलली जातील, असेही पवार म्हणाले.

अशा परिस्थितीतही व्हिप लागू होतो

सभागृहामध्ये व्हीप पाळला नाही तर तो व्हीपचा भंग ठरतो आणि पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, सर्व सामान्य समज आहे. व्हीप दिल्यानंतर हाऊसमध्ये त्याचा भंग केला तरच त्यांच्यावर कारवाई होते असं आम्हालाही वाटत होतं. पण सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आहे. आमदार, खासदारांनी विधानसभा किंवा संसदेच्या बाहेर पक्षाच्या विरोधात स्टेटमेट दिलं किंवा वेगळं पाऊल उचलंल तर त्यांनाही व्हीप लागू होतो. मला वाटतं या लाईनवर शिवसेना जाईल, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. याबाबतचा निर्णय राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं होतं. असंही पवार यांनी सांगितलं.
आमदारांवर कारवाई होणारच

बंडखोर आमदारांवर आज किंवा उद्या काही कारवाई होण्याची शक्यता आहे. 16 किंवा 14 आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच या लढाईत उद्धव ठाकरे यांचा विजय होईल. ते त्यांच्या कामातून, पक्षाच्या चौकटीतून बंडखोर आमदारांशी संवाद साधत आहेत. बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर त्यांची भूमिका बदलेल, असंही शरद पवार म्हणाले.

Previous articleयुवकांचे युवानेते सरपंच ज्ञानेश्वर पवार यांची आमखेल वि.का.सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड
Next articleज्येष्ठ समाजसेवक लिंबाजी आंद्रे यांचे १०६ व्या वर्षी निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here