आशाताई बच्छाव
भारतीय जनता पार्टी तर्फे अनुसूचित जनजाति मोर्चा चे मुंबई येथे
राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीन दिवसीय अनुसूचित जनजाति मोर्चा चे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाति मोर्चा यांनी मार्गदर्शन करतांना..
अनुसूचित जनजातिमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.तसेच भारत सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठीसुद्धा प्रयत्न केला जाईल.
त्या अनुषंगाने आयोगाच्या कार्यकक्षा व त्यांचे अधिकार काय आहेत.तसेच अनुसूचित जनजातीसाठी कायदे व विविध योजनांची माहिती या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराच्या अभियान निमित्याने करण्यात आले.
अनुसूचित जनजातिसाठी असणाऱ्या आर्थिक विकास योजना या त्या जातीसाठीच राबविल्या जातील.असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी केले.
या प्रसंगी मा.समीर उरावजी राष्ट्रीय अध्यक्ष जनजाती मोर्चा,मा.व्ही सतीशजी राष्ट्रीय संघटक.मा.अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती मोर्चा,
मा.रवींद्रसाठेजी.मा.माधवभंडारीजी,मा.हर्षचव्हाणजी,मा.बिशवेशवर तुडुजी आदिवासी विकास भारत सरकार.मा.रामसिंगजी राठाव,मा.गजेंद्र पटेलजी,मा.कलीराम मांझी,गोवा विधानसभा स्पीकर रमेश तावडकर
आदी अनेक पदाधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते