Home नाशिक साल्हेर येथील आदिवासी समस्यांच्या विळख्यात !!

साल्हेर येथील आदिवासी समस्यांच्या विळख्यात !!

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220619-WA0036.jpg

साल्हेर येथील आदिवासी समस्यांच्या विळख्यात !!
युवा मराठा न्युज✍🏻
ताहाराबाद (प्रतिनिधी)प्रविण पवार
महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले व सर्वात उंच किल्ला म्हणून नावलौकिक असलेले साल्हेर हे गाव तसे शंभर टक्के आदिवासीबहुल गाव असून पेसा अधिनियम अंतर्गत समाविष्ट असलेले गुजरात व महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर असलेले एक छोटेसे आदिवासी गाव आहे.या गावात पाच सहा पाडे मिळुन गृप ग्रामपंचायत आहे.बागलाण तालुक्याचा पश्चिम भाग हा संपूर्ण आदिवासीबहुल असल्याने साल्हेर व परिसर हे पेसा क्षेत्रात समाविष्ट आहेत. आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून लाखो रूपयांचा निधी या भागातील सर्वच ग्रामपंचायतींना दरवर्षीच प्राप्त होत असतो.त्याचप्रमाणे साल्हेर येथील ग्रामपंचायतीला देखील लाखो रूपयांचा निधी उपलब्ध असुनही येथील आदिवासींना नागरी सुविधांच्या अभावी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
साल्हेर ग्रामपंचायत मार्फत 15 व्या वित्त आयोग मधून पाणी पुरवठाच्या नावाने लाखो रुपये हडप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.साधारण मुतारीच्या बांधकामासाठी तिन लाख रूपये खर्च व एका घरकुलासाठी फक्त एक लाख वीस हजार असा अजब न्याय शासनाकडून कसा मिळतो ?? असाही प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला गेला.तसेच आदिवासी भील वस्तीत कॉक्रिटीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे असून येथील अंगणवाडीत अक्षरशः घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असूनही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन सुन्न अवस्थेत आहे.
यावेळी आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेकडे व बिरसा फायटर्स संघटनेकडे येथील आदिवासींनी तक्रार दाखल केल्यामुळे संस्थेमार्फत व संघटनेमार्फत रविवारी साल्हेर येथील आदिवासी ग्रामस्थांची भेट घेतली.तेव्हा येथील आदिवासींनी समस्यांबाबत सांगीतले.येथील मुख्य समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय लवकर करण्यात यावी,अंगणवाडीतील घाणीचे साम्राज्य नष्ट करावे,पेसा अबंध निधी दरवर्षी किती येतो व त्याचा खर्च कसा होतो,पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरुस्ती करावी,घरकुल योजनेत सर्वांना समान न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांसह अनेक समस्यांबाबत येत्या दोन दिवसांत ग्रामपंचायत प्रशासनाकडून समस्यांचे निराकरण न झाल्यास पंचायत समिती बागलाण येथे मा.गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
यावेळी आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.प्रविण पवार सर, सचिव मा.मश्चिंद्र बोरसे सर, प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार, सभासद शशी बर्डे,बिरसा फायटर्स संघटनेचे मा.संजय दळवी साहेब,छोटु दळवी,भरत बोरसे,हिरालाल गायकवाड, भाऊसाहेब माळी,सचिन सोनवणे,कृष्णा पवार, निलेश देवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसोलापुरात मोठी कारवाई 8 लाखाची गोवा बनावटीची देशी दारू जप्त
Next articleरा . काँच्या सोशल मीडिया तालुका प्रमुखपदी अंकुश कड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here