Home बीड नाथ प्रतिष्ठाणच्या बक्षिस वितरणासाठी जहीर खान येणार परळीत

नाथ प्रतिष्ठाणच्या बक्षिस वितरणासाठी जहीर खान येणार परळीत

121

आशाताई बच्छाव

IMG_20240227_072801.jpg

नाथ प्रतिष्ठाणच्या बक्षिस वितरणासाठी जहीर खान येणार परळीत

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

 

बीड/परळी दि: २६  भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिलेला जहीर खान नाथ प्रतिष्ठाणच्या बक्षिस वितरणासाठी ०३ मार्चला परळीमध्ये येणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षी परळीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेसाठी जिल्हा आणि राज्यातून अनेक स्पर्धक येत असतात. या स्पर्धेचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम रविवार दि: ०३ मार्च रोजी दुपारी ०२ वाजता होणार आहे. यासाठी जहीर खान यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी नामदार चषकाचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ०३ मार्चला या स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार असून यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिलेले जहीर खान येणार आहेत. दरवर्षी नाथ प्रतिष्ठाणच्या बक्षिस वितरणासाठी राज्यातील प्रतिष्ठित व्यक्ती येत असतात. कधी कलाकार तर कधी राजकीय व्यक्तींचा समावेश असतो. यंदा भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जहीर खान यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या बक्षिस वितरण समारंभाला नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleखा. गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिनेस क्लब,श्रीरामपूर यांच्या वतीने लोयोला चर्चला बेंचेस भेट
Next articleभावनांचे विश्व
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.