आशाताई बच्छाव
वाण नदी पात्रात गौण खनिजांचे उत्खनन करताना जेसीबी जप्त
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख सह
संग्रामपुर तालुका विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर :- तालूक्यातील सगोडा शिवारातील वाण नदी पात्रात अवैधरीत्या गौण खनिजांचे उत्खनन करतांना जेसीबी बावनबीर मंडळ अधिकारी बोराखडे यांनी जप्त करून दक्षता समिती समक्ष पंचनामा करण्यात आला व सदरचे वाहन पुढील कारवाई करेपर्यंत सोनाळा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. वाण नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सूरू असल्याची माहीती मंडळ अधिकारी रवीद्र बोराखडे यांना मिळाली या माहितीवरून दिनांक 17जुन2022रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सगोडा वान नदीपात्रात दाखल होऊन अवैध रित्या नदीपात्रात जेसीबी द्वारे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले त्या जेसीबी वर चालक म्हणून विनायक खंडेराव रा. सौंदळा जिल्हा अकोला हे होते तर जप्त केलेल्या वाहनाचे मालक सुरेश ताठे असुन सदरची कार्यवाही ही मंडलाधिकारी आर आर बोराखडे, तलाठी यु एल दाभाडे, तलाठी शेख रियाज व कोतवाल विठ्ठल मिरगे यांनी कारवाई केली. विशेष म्हणजे वान नदीपात्रात अवैध रेती उत्खनन हे रात्रीचे वेळेस व पहाटे पासून सकाळी दहा वाजेपर्यंत फार मोठ्या प्रमाणात चालू असते कारण सगोडा नदीपात्रात मंडळ अधिकारी बोराखडे यांचे पथक दाखल होताच त्यांना नदीपात्रात उत्खनन करतांनी जेसीपी आढळून आली त्याचप्रमाणे इतरत्र काटोल कोलद काकनवाडा रिंगणवाडी मोमिनाबाद या नदीपात्रात जर सकाळी लवकर फेरफटका मारला असता तर फार मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करतांनी वाहनांवर कार्यवाही होऊ शकली असती आणि त्यामुळे शासनाच्या खजिन्यात फार मोठी रक्कम जमा झाली असती. आणि वान नदीपात्रातील राजरोसपणे चालू असलेल्या रेती उत्खननावर आळा सुद्धा बसला असता परंतु संग्रामपूर महसूल विभाग व ग्राम दक्षता समिती हे काटेल कोलद, काकनवाडा,रिंगण वाडी,मोमीनाबाद या गावांकडे हेतुपुरस्पर पणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे.