Home पुणे हिंदू ,मुस्लीम ,शिख ,इसाई बौद्ध या सर्व धार्मियांच्या गुरूंच्या वतीने आळंदी ते...

हिंदू ,मुस्लीम ,शिख ,इसाई बौद्ध या सर्व धार्मियांच्या गुरूंच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणारे वारकरी यांचा सन्मान करण्यात आले

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0041.jpg

हिंदू ,मुस्लीम ,शिख ,इसाई बौद्ध या सर्व धार्मियांच्या गुरूंच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणारे वारकरी यांचा सन्मान करण्यात आले
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश. पाटील
हिंदू ,मुस्लीम ,शिख ,इसाई बौद्ध या सर्व धार्मियांच्या गुरूंच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणारे वारकरी यांचा सन्मान करण्यात आले
होली क्रॉस चर्च चे फादर अल्बर्ट फर्नांडिस, मौलाना इक्बाल कारी साहब, मौलाना लियाकत शेख ,त्रिरत्न बौद्ध महविहार चे धम्मचारी संघभद्र , खाडे बाबा मठ चे गुरुवर्य राघव चैतन्य काटे महाराज वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी भास्कर जाधव व संजय नाना काटे मा.नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आला. कोविड १९ च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्ष पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. यावर्षी पालखी सोहळयाला परवानगी मिळाल्याने सर्व वारकऱ्यांच्या आनंदास पारावार राहिला नाही. या वारकऱ्यांच्या आनंदामध्ये सर्व धार्मियांच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील वारकरी यांचा सन्मान सर्व धार्मिक गुरुच्यां व संजय नाना काटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ,रेनकोट व बँग देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी यावेळी सर्व धर्मियांच्या गुरुनी आपले मनोगत व्यक्त करताना मानवता हाच धर्म आहे यामुळे प्रत्येक मानवामध्ये प्रेम निर्माण होते आज जगामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये एकमेकावर प्रेम केल्यामुळे व एकमेकास सहाय्यक केल्यास प्रत्येकाला देव त्यांच्यामध्येच मिळतो.तसेच सर्व धार्मियांचा सहभाग वारीमध्ये असतो समानतेची शिकवण व लहान थोरांना माऊली म्हणून पुढे चालण्याची व समानतेची शिकवण पायीवारीमध्ये दिली जाते.त्यामुळे आज पायी वारी करणाऱ्या जो सन्मान होतो तो खरोखरच आपण तो त्यांना देव म्हणून करतो आज जगामध्ये प्रत्येकाने संताच्या विचारणे चालू आहे तर त्यांना या विषयामध्ये सुख प्राप्त होईल असे मत सर्व धर्म यांच्या गुरुंनी व्यक्त केले यावेळी संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व त्यानंतर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ चंद्रभागा भाडाळे राजश्री बाईत सुनिता बोत्रे कविता कणसे सुरेखा काटे गजराबाई काटे भारती काटे नंदा काटे मुक्ताबाई शेळके सुंदा कमतगी विजय कणसे माणिक काळभोर यशवंत बोधे शिवाजी काटे सुरेश काटे सुरेश किंडरे सुलोचना काटे अरुण काटे उमेश काटे इत्यादी पायी वारी करणाऱ्या यांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी संतोष काटे, विराज काटे , जाकीर शेख धनराज गायकवाड विलास अण्णा काटे मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक ज्ञानेश्वर भाडाळे आभार प्रर्दशन कालीचरण पाटोळे यांनी केले.

Previous articleवाण नदी पात्रात गौण खनिजांचे उत्खनन करताना जेसीबी जप्त
Next articleभोसरीत युवकाचा निर्घृण खून
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here