Home पुणे भोसरीत युवकाचा निर्घृण खून

भोसरीत युवकाचा निर्घृण खून

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0056.jpg

भोसरीत युवकाचा निर्घृण खून
पिंपरी,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज) – पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात एकाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला आहे. भोसरीतील निर्जनस्थळी आज सकाळी युवकाचा मृतदेह आढळून आला.

दीपक गोपाळ वाघमारे (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक वाघमारे यांचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. त्यांच्या डोक्यात दगड मारल्याची देखील जखम आहे. रात्री उशिरा ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली आहे.

घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुन करणा-या गुन्हेगारांचा पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here