Home नाशिक वाजगाव आश्रम शाळेतील अनाथ नेहाचे सुयश

वाजगाव आश्रम शाळेतील अनाथ नेहाचे सुयश

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0006.jpg

(भिला आहेर ता.प्र.युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:-इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून देवळा तालुक्यातील वाजगाव आश्रम शाळेतील नेहा संतोष इंद्रेकर ह्या विद्यार्थीनीने ८७.५८ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे नेहाचे आई-वडील हयात नसतांना अनाथ आणि अतिशय गरीब कुटुंबातील व भटक्या जमातीतील कंजारभाट समाजातील ह्या मुलीने परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे. विशेष करून नेहा ही नेहमी आजारी असल्यामुळे ती शाळेत देखील वेळेवर जाऊ शकत नव्हती आणि शारीरिक व्याधीमूळे ती तीन तासाचा पेपर फक्त दोन तासातच पूर्ण करत होती. अनाथ तसेच स्वतःची शेती तर सोडाच पण राहण्यासाठी घराला जागाही स्वतःच्या मालकीची नसतांना व शारीरिक व्याधी असतांना पूर्ण दिवस कुठे कामही करू शकत नाही अशा परिस्थितीत एका खासगी दवाखान्यात ती साफसफाईचे काम करत मिळणाऱ्या पैशातून ती आपल्या शारीरिक व्याधीवर उपचारासाठी खर्च करत तिने ह्या आश्रमशाळेत द्वितीय क्रमांक मिळवला . मूळची वणी येथील असलेल्या नेहाला दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार तिच्या सोबत आहे . तसेच तिला खास करून तिच्या काकांचा मुलगा व पत्रकार सतीश इंद्रेकर हे वेळोवेळी सर्वच प्रकारची मदत करत असतात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नेहाने जे यश संपादन केले आहे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleप्रणिता शिंदे केंद्रात प्रथम तर प्रणव एमेकर द्वितीय.
Next articleवाण नदी पात्रात गौण खनिजांचे उत्खनन करताना जेसीबी जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here