• Home
  • 🛑 महाड दुर्घटना …! मृतांचा आकडा वाढला….! बिल्डर फरार 🛑

🛑 महाड दुर्घटना …! मृतांचा आकडा वाढला….! बिल्डर फरार 🛑

🛑 महाड दुर्घटना …! मृतांचा आकडा वाढला….! बिल्डर फरार 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रायगड :⭕महाड येथे पाच मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. अजूनही ढिगारा उपसण्याचं काम सुरूच आहे.

अजून आठ जण बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, पोलिसांनी या इमारत दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. बांधकाम व्यावसायिक फारूक काझी हा अद्याप फरार आहे.

पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फारूक काझी याच्या मुलाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. वडिलांच्या लोकेशनबाबत पोलीस त्याच्याकडून माहिती घेत आहेत.

फारूक काझी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment