Home Breaking News 🛑 ‘या’ नियमांचं करावं लागेल पालन, NTA नं जारी केली नवीन गाइडलाइन...

🛑 ‘या’ नियमांचं करावं लागेल पालन, NTA नं जारी केली नवीन गाइडलाइन 🛑

117
0

🛑 ‘या’ नियमांचं करावं लागेल पालन, NTA नं जारी केली नवीन गाइडलाइन 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 27 ऑगस्ट : ⭕ नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई-एनईईटी परीक्षा सुरक्षित बनविण्यासाठी आणि उमेदवारांची भीती कमी करण्यासाठी मंगळवारी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्याअंतर्गत परीक्षा केंद्रे वाढविण्यात आली आहेत. यामुळे एक शिफ्ट आणि वर्गातील उमेदवारांची संख्या कमी होईल.

जेईई मेन्स ही संगणक आधारित चाचणी आहे, तर नीट लेखी आहे. त्याचबरोबर एनटीए आणि शिक्षण मंत्रालयानेही स्पष्ट केले की, सप्टेंबरमध्ये त्यांच्या निर्धारित वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहेत. जेईई अ‍ॅडमिट कार्ड दिली गेली आहेत आणि विद्यार्थ्यांनी डाउनलोड देखील केली आहे. नीट अ‍ॅडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गोंधळामध्ये राहू नये. एनटीएने 99% विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पहिल्या प्राथमिकतेचे परीक्षा केंद्र सुनिश्चित केले आहे. जेईई मेनसाठी 8.58 लाख आणि नीटसाठी 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

➡️ जेईई आणि नीटसंदर्भातील जारी केलेल्या महत्त्वाच्या गोष्टी :-

1) नीट परीक्षेदरम्यान 24 ऐवजी 12 उमेदवार वर्गात बसतील.
2) नीट परीक्षा केंद्रे 2546 वरुन 3843 करण्यात आली आहेत.
3) जेईई परीक्षेची शिफ्ट 8 वरून 12 व परीक्षा केंद्रे 570 वरून 660 करण्यात आली आहेत.
4) जेईईमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक जागा सोडून बसविण्यात येईल.
5) जेईईच्या एका शिफ्टमध्ये एक लाख 32 हजार ऐवजी 85 हजार उमेदवार बसतील. दरम्यान, सीटिंग प्लॅनही बदलण्यात आला आहे.
6) उमेदवारांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखून ठेवावे लागेल.
7) ज्या विद्यार्थ्यांचे शरीराचे तापमान 99.4 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त आहे, त्यांना आयसोलेशन रूममध्ये नेले जाईल. ते तेथे बसून परीक्षा देतील.
8) फ्रिस्किंग, कागदपत्रांची पडताळणी नोंदणी कक्षात केली जाईल.
9) परीक्षा केंद्रात उमेदवारांना नवीन मास्क देण्यात येईल. परीक्षा केंद्रात प्रवेश पत्र, आयडी प्रूफ, फक्त पाण्याची बाटली, हँड सॅनिटायझर यांना परवानगी देण्यात येणार आहे.
10) विद्यार्थ्यांना परीक्षा देताना मास्क घालणे आणि ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक होणार नाही.
11) प्रत्येक उमेदवाराला सेल्फ डिक्लरेशन द्वारे लागेल की, तो कोरोना पॉझिटिव्ह नाही किंवा कोरोना पेशंटच्या संपर्कात आला नाही.⭕

Previous article🛑 पालक पराठ्याची पौष्टिक रेसिपी 🛑
Next article🛑 महाड दुर्घटना …! मृतांचा आकडा वाढला….! बिल्डर फरार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here