• Home
  • 🛑 भररस्त्यावर वापरलेले पीपीई किट फेकले; जळगावकर घाबरले 🛑

🛑 भररस्त्यावर वापरलेले पीपीई किट फेकले; जळगावकर घाबरले 🛑

🛑 भररस्त्यावर वापरलेले पीपीई किट फेकले; जळगावकर घाबरले 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव , 27 ऑगस्ट : ⭕ शहरातील मोहाडी रस्त्यावर असलेल्या खुबचंद साहित्या टॉवरजवळ रस्त्याच्याकडेला अज्ञात व्यक्तींनी वापरलेले पीपीई किट फेकून दिले आहेत. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. अशा प्रकारामुळे करोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक घाबरून गेले असून या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत.

जळगाव शहरातील अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोहाडी रस्त्यावर जात असतात. आज सकाळी काहीजण मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना, खुबचंद साहित्या टॉवरजवळ रस्त्याच्याकडेला वापरलेले पीपीई किट मोठ्या संख्येने फेकलेले दिसून आले. त्यात हॅन्डग्लोज, फेस मास्क, पीपीई किटमधील एप्रॉन असे साहित्य आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने काही सुज्ञ नागरिकांनी तातडीने सोशल मीडियावर या प्रकाराची माहिती व्हायरल केली. नियमानुसार, करोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरलेले पीपीई किट हे जैविक कचऱ्यात वर्गीकृत करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करायला हवे. मात्र, जळगावात खासगी रुग्णालयांकडून पीपीई किटची विल्हेवाट लावण्यात हलगर्जीपणा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका प्रशासनाने जैविक कचऱ्याचे संकलन करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचा दावा केला असला तरी अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, उघड्यावर फेकून दिलेले पीपीई किट तत्काळ उचलून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली जात आहे.⭕

anews Banner

Leave A Comment