• Home
  • 🛑 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय MPSC परीक्षाबाबात🛑

🛑 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय MPSC परीक्षाबाबात🛑

🛑 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय MPSC परीक्षाबाबात🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 27 ऑगस्ट : ⭕ कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.

कोरोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यातच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी. यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी तसेच येत्या 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment