Home नाशिक पिंगळवाडे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.

पिंगळवाडे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0016.jpg

पिंगळवाडे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क
जिल्हा परिषद शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिंगळवाडे येथे नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.
शालेय शिक्षण विभाग यांच्या आदेशान्वये दिनांक १५.६.२०२२ रोजी सर्व स्तरातून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यात याव्यात. याच अनुषंगाने पिंगळवाडे येथे प्रथमता गावातून विद्यार्थी,शिक्षक, पालक व अंगणवाडी सेविका यांच्या कडून जनजागृती फेरी काढण्यात आली. यासाठी प्राथमिक विद्यालयाचे व माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सहभागी होते. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडे येथे विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक गावातील ग्रामस्थांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी विजय भामरे, रवींद्र भामरे, बापू भामरे, संतोष वाघ, शिक्षक धुडकु गांगुडेॅ,मनिष शेवाळे,राजेंद्र देवरे,श्रीमती.निकम मॅडम, अंगणवाडी सेविका सुनंदा बच्छाव,अश्विनी भामरे ,अनिता भामरे,वर्षा भामरे,योगीता कोठावदे,केदाबाई अहिरे,इ. त्याच बरोबर शाळा पूर्व दुसरा मेळावा संपन्न झाला. यात मुलांच्या सर्वांगीण विकासात भर पडावी यासाठी मुलांकडून टेबल निहाय चित्र काढणे,रंग भरणे,अक्षर ओळख इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. त्याच प्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील विध्यालयातहि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यात गावातील ग्रामस्थ अंतु भामरे,दिलीप भामरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्या बरोबरच पाठ्य पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कडून नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी व ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक भोये सर यांनी आपले काम पाहिले. तसेच याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.त्यात मुख्याध्यापक के.एस. भोये,उपशिक्षक डी.सी.पवार,वाय.डी.सोनवणे,पि.के.कापडणीस.एल.एम.पवार,ए.आर.वाघ,टि.वी.खेताडे.वाघ मॅडम,बल्लक मॅडम,विश्वास भामरे,दिलीप बागुल,पोपट भामरे.इ उपस्थित होते

Previous articleनवेगाव रै. येथे डि.पि.डी.सी. अंतर्गत डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन
Next articleमराठा समाजास सर्व प्रकारे सहाय्य- केंद्रीय मंत्री भगवंत खुबा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here