Home सामाजिक मराठा समाजास सर्व प्रकारे सहाय्य- केंद्रीय मंत्री भगवंत खुबा

मराठा समाजास सर्व प्रकारे सहाय्य- केंद्रीय मंत्री भगवंत खुबा

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0054.jpg

मराठा समाजास सर्व प्रकारे सहाय्य- केंद्रीय मंत्री भगवंत खुबा
गुलबर्गा जिल्हा प्रतिनिधी यशवंतराव सूर्यवंशी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 12 जून 2022 रोजी कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुका येथे आळंद उमरगा रस्ते येथे मराठा समाजाच्या जागेचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री श्रीमान भगवंत खुबा व मराठा निगम मंडळाचे अध्यक्ष श्रीमान मारुतीराव मुळे आळंद तालुक्याचे आमदार श्रीमान सुभाष आर गुत्तेदार यांच्या हस्ते संपन्न झाले. नगरातील आर्यसमाज मंदिरामध्ये तालुका मराठा समाजाच्या आश्चयामध्ये राज्य निगम अध्यक्ष व माजी आमदार श्री मारुती राव मुळे यांनी आळंद उमरगा रस्त्यामधील जागेत मराठा समाजासाठी भव्य भवन निर्माण करण्यासाठी भूमी पूजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये मराठा समाजामध्ये केवळ हिंदुत्व दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविधते मध्ये एकतेचे वर्णन भारतीय संस्कृतीमध्ये दिसून येते असे वक्तव्य केंद्रीय मंत्री श्रीमान भगवंत खुबा यांनी केले. माजी आमदार व मराठा निगमचे अध्यक्ष श्रीमान मारुतीराव मुळे निगम च्या वतीने जनतेसाठी विविध सोयी सवलती निर्माण करून देण्यासाठी मी सर्वतोपरीने प्रयत्न करेन मराठा समाजासाठी सतत सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. अशी ग्वाही त्यांनी दिली. आळंद चे आमदार श्रीमान सुभाष गुत्तेदार यांनी आळंदनगरी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणी चौकांमध्ये निर्माण करण्यात येईल. असा भरवसा त्यांनी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखविला. मराठा समाज आळंद तालुका अध्यक्ष श्री नागनाथ येटे यांनी आळंद नगरीच्या मध्यवर्ती भागात सहा महिन्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून देईन असे वक्तव्य त्यांनी केले. त्याचप्रमाणे त्यांनी मराठा समाजासाठी आपले मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमांमध्ये गुलबर्गा जिल्हा के. के. एम. पी. चे अध्यक्ष श्री आर. बी. जगदाळे, दूध डेअरी चे अध्यक्ष श्री आर. के. पाटील आळंद, श्री दत्तू घाटगे, के. के. ए.म पी. चे सेक्रेटरी श्री राजू काकडे, मराठा भूषण श्री यशवंतराव सूर्यवंशी, सोमवंशी क्षत्रिय समाजाचे श्री संजय मिस्कीन, के.के. वकुटचे जिल्हाध्यक्ष श्री एम. एस. पवार, व्यंकट मेंदे आदी उपस्थित होते.

Previous articleपिंगळवाडे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here