Home मुंबई काँग्रेसचे खासदार श्री राजीव सातव यांचे कोरोनाने आकस्मिक निधन…

काँग्रेसचे खासदार श्री राजीव सातव यांचे कोरोनाने आकस्मिक निधन…

411
0

Anshuraj patil

काँग्रेसचे खासदार श्री राजीव सातव यांचे कोरोनाने आकस्मिक निधन…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील २१ दिवसापासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. अखेर खासदार राजीव सातव यांचा कोरोनाने बळी घेतला.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये वजन असलेला महाराष्ट्राचा उमदा-तरुण नेता गेला.हे केवळ काँग्रेसचे नुकसान नसून संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे.महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभुत्व ठेवणारे नेते,महाराष्ट्रात अनेक झाले.पण,त्यांना दिल्लीत गेल्यावर प्रभुत्व ठेवता आले नाही.पण,मा.राजीव सातव साहेब यांना दिल्लीच्या राजकारणात अत्यंत कमी वयात प्रभुत्व ठेवता आले होते.आणि हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे होते.
मा.राजीव सातव साहेबांचे अकाली झालेले निधन,हे अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here