Home परभणी नागरिकांनी पकडून दिली सहा बॉक्स देशी दारू

नागरिकांनी पकडून दिली सहा बॉक्स देशी दारू

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0011.jpg

नागरिकांनी पकडून दिली सहा बॉक्स देशी दारू
सावंगी भांबळे:– जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे दि .13 सोमवार रोजी सायंकाळी सात च्या सूमारात गावातील काही नागरिकांना अंभुर ता . मन्ठा येथून अवैध देशी दारूचे सहा बॉक्स घेऊन दोन व्यक्ती येत असल्याची माहिती सावंगी भांबळे येथील काही युवकांना माहीत झाली त्यामुळे तात्काळ गावातील युवक त्या ठिकाणी गेले आणि दोन युवक आणि तीन देशी दारूचे बॉक्स ताब्यात घेऊन त्याना गावात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणात रंजीत लिंबाजी भांबळे, ध्न्यानेश्वर प्रल्हाद खूपसे .रा .सावंगी भांबळे आणि प्रदीप अशोकराव चव्हाण व जयेश लक्ष्मण आंधळे या चौघां विरुद्ध 65ई , व 83 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि यांच्याकडून चोवीस हजार अंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सावंगी येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी महिलांचा मोठा सहभाग काही दिवसांपूर्वीच गावातील महिलांनी गावातील अवैध धंदे बंद करा म्हणून मा .पोलिस अधीक्षक परभणी यांना निवेदन दिले होते गावातील अवैध दारू काही प्रमाणात बंद देखील झाली होती पण अधून मधून लपून काही विक्रेते खिशात तीन चार बाटल्या ठेऊन विक्री करत आहेत

पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची गावातील युवकांनी सर्व सहा बॉक्स अवैध दारू पकडली होती पण त्या मधली तीन बॉक्स दारू ही गावात पार्सल जाहली होती त्यामुळे गावकऱ्यांचे म्हणणे होते की तुम्ही गावातील ज्या दारू विक्रेत्यांना ते बॉक्स दिले तत्यांच्या वर पण कारवाही करा आणि मुद्देमाल आणि आरोपी पोलिस ठाण्यात घेऊन जा पण पोलिस गावातील दारू विक्रेत्यांना पकडत नवते म्हणून पोलिस आणि महिला आणि गावातील युवकांमध्ये बराच वेळा बाचाबाची झाली …रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती ..
प्रतिक्रिया सावंगी भांबळे गावामध्ये बऱ्याच दिवसापासून आम्ही लक्ष्य दिल्यामुळे आणि महिलांच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बऱ्याच प्रमाणात कमी जालीं आहे आणि इथून पुढे ही तुम्ही कधीही आम्हाला कळवा आम्ही अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मदत देऊ आणि कारवाई करण्यास कधीही तत्पर आहोत अवैध धंदे करनाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही …
गोवर्धन भूमे
पोलिस निरीक्षक पो. स्टे. बामनी                          शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो टिम युवा मराठा न्युज परभणी

Previous articleआला आला कोरोना तब्बेती आपल्या सांभाळा! गडचिरोली जिल्हात मास्क वापरणे बंधनकारक ; अन्यथा 500 रुपये दंड 
Next articleसंयुक्त केंद्र प्रमुख म्हणून डॉ.पवन एमेकर यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here