Home रत्नागिरी डॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट गणपतीपुळे येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात

डॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट गणपतीपुळे येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0035.jpg

डॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट गणपतीपुळे येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात                    रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी तालुक्यातील डॉ. निमकर यांचे कोकण नेस्ट रिसॉर्ट गणपतीपुळे येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व दिमाखात साजरा झाला. यावेळी मालगुंड येथील मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु. वैष्णवी किरण सावंत हिला ध्वजारोहणाचा मान मिळाला. ध्वजारोहणास भगवती नगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड संचालन करून राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.

ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत व देशभक्तीपर गीत गायनाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची ऊर्जा जागृत केली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या दिनाचे औचित्य साधून भगवतीनगर सरपंच नूतन मायंगडे, ग्रामस्थ उल्हास पिंपुटकर, निवेंडीचे केंद्रप्रमुख पुरुषोत्तम केळकर सर यांनी प्रबोधनपर भाषणे केली.

कोकण नेस्ट रिसॉर्ट चे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी समारोपाच्या भाषणात कु. वैष्णवी सावंत हिचे पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मान करत कौतुक केले व सर्व मान्यवरांचे सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानून, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सर्व देशभक्तांचे स्मरण केले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त मिठाईचे वाटप करून भारत माता की जय! च्या जल्लोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

या सोहळ्याला डॉ चंद्रशेखर निमकर, माधवाश्रम ग्रुप च्या गौरी वेलणकर, सरपंच नूतन मायंगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोसले, सौ. आरती जाधव,सौ. पाष्टे, पोलिस पाटील नितीन मायंगडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री शेट्ये सर व त्यांचे सहकारी शिक्षक, अंगणवाडी सेविका श्रीमती पवार मॅडम, आरोग्य सेविका वैष्णवी घाणेकर, केंद्र प्रमुख श्री केळकर सर, ग्रामस्थ श्री सतिश सोबळकर,योगेश कुळकर्णी, सुभाष शितप, विनायक मोहिते, उल्हास पिंपुटकर, राजेंद्र शिंदे, सतिश नमसले, अभय शिरगावकर, अजित पावसकर, सुधीर जाधव, एकनाथ नवेले, प्रकाश लोगडे, ओंकार आंग्रे, विद्यार्थी व त्यांचे पालक, कोकण नेस्ट रिसॉर्ट चे कर्मचारी वृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरत्नागिरीच्या सिव्हिल हाॅस्पिटलचे कर्मचारी चांगली सेवा देत असल्याचा मी साक्षीदार- मंत्री उदय सामंत
Next articleनांदगांव तालुक्यात साथीचे साम्राज्य         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here