Home नांदेड येवती येथे नराशाम महाराज पब्लिक स्कूलचे उद्घाटन संपन्न !

येवती येथे नराशाम महाराज पब्लिक स्कूलचे उद्घाटन संपन्न !

79
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0056.jpg

येवती येथे नराशाम महाराज पब्लिक स्कूलचे उद्घाटन संपन्न !

श्री सद्गुरू नराशाम महाराज यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न !

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील लघु आळंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवती तीर्थक्षेत्र येथे शिवम पाटील बहुउद्देशीय संस्था जिरगा द्वारा संचलित संचालक
आनंद भानुदास राठोड यांचा संकल्पनेतून साकारलेल्या परमपूज्य श्री सद्गुरु नराशाम महाराज पब्लिक स्कूलचे ८ जुन रोजी येवती येथे प्रतिष्ठित मान्यवरांच्या व पालक ,बाल विद्यार्थी शिक्षक वृंद तसेच गावकऱ्यांच्या भव्य उपस्थित श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे.

येवती गाव जिल्हा परिषद सर्कल व तिर्थक्षेत्राचे मोठे गाव असून आजपर्यंत येथे मुलांसाठी पब्लिक स्कूल नव्हते अधिच कोरोना महामारीमुळे २ वर्षांपासून मुलांचे भवितव्य धोक्यात आले होते. कोरोना महामारीमुळे श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूलचे उद्घाटन २ वर्षांपासून लांबणीवर पडले होते.

मात्र संचालक आनंद भानूदास राठोड यांच्या
प्रयत्नामुळे व श्री सद्गुरू नराशाम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नुकतच येवती येथे श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूलचे उद्घाटन येवती मठाचे मठाधिपती श्री सद्गुरू नराशाम महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले असून आता मुलांना गावातच उच्च शिक्षणाची सोय झाल्यामुळे येवती व परिसरातील पाल्यांत समाधानाचे वातावरण दिसून येते आहे.

या उद्घाटन सोहळ्याला गावातील आजी माजी सरपंच पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटा तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य, व्यापारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक शेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार तसेच माझा मित्रपरिवार, माझे सहकारी व पालक, विद्यार्थी इत्यादी आमच्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित केल्याचे सांगत येवती व आजुबाजूच्या परिसरातील पालकांनी आपल्या पाल्याचे ऍडमिशन त्वरित येवती येथील श्री सद्गुरु नराशाम महाराज पब्लिक स्कूलमध्ये घेऊन सहकार्य करावे असे आवाहन
संचालक आनंद भानूदास राठोड यांनी‌ पत्रकारांशी बोलताना केले आहे . ‌‌

Previous articleमुखेड मतदारसंघात विकास तीर्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन.
Next articleलोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here