Home वाशिम वनोजा सर्कलमधील फळबागा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत द्या – सुरेश मापारी

वनोजा सर्कलमधील फळबागा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत द्या – सुरेश मापारी

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240318_185022.jpg

वनोजा सर्कलमधील फळबागा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत द्या – सुरेश मापारी
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा सर्कलमध्ये वादळासह पाऊस पडल्याने शेतकर्‍यांच्या फळबागाचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त नुकसान शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि. प. अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
१७ मार्चला दुपारी तीनच्या दरम्यान वादळासह पाऊस कोसळला. त्यामुळे या सर्कलमधील अनेक गावात घरावरील टिनपत्रे उडून गेली. लग्न समारंभासाठी टाकलेले मांडव व साहित्य या वादळात उडून गेले. शेतातील संत्रा, आंबा, ज्वारी, कांदा आदी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासन व शासन यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी निराश होवून कोलमडून पडेल. सुरेश मापारी यांनी गारपीट व वादळात सापडलेल्या परिसराची पाहणी करून जिल्हाधिकारी यांना तसे फोनवरून माहिती देत मदतीची मागणी केली आहे. याआधी झालेल्या गारपिट प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने अद्यप नुकसान भरपाई दिली नाही. तर पुन्हा आता हे दुसरे संकट शेतकर्‍यावर कोसळले आहे. आता तरी शासनाने याबाबत गांभीर्याने घेत महसूल विभागाला नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल पाठवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी सुरेश मापारी यांनी केली आहे. यासोबतच  घरावरचे तीन उडून गेल्यामुळे बेघर झालेल्या नागरिकांना निवार्‍याची व्यवस्था करावी अशी ही मागणी मापारी यांनी केली आहे.

Previous articleधरण उशाला आणि कोरड घशाला; कर वसुलीचे बोर्ड लावल्याचा जाहीर निषेध!
Next articleउक्कडगावच्या आशा स्वयंसेविकेस ‘समृद्धी’ची  २१ हजाराची मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here