Home बीड धरण उशाला आणि कोरड घशाला; कर वसुलीचे बोर्ड लावल्याचा जाहीर निषेध!

धरण उशाला आणि कोरड घशाला; कर वसुलीचे बोर्ड लावल्याचा जाहीर निषेध!

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240318_184709.jpg

धरण उशाला आणि कोरड घशाला; कर वसुलीचे बोर्ड लावल्याचा जाहीर निषेध!

नागरिकांच्या सुविधेचा पालिकेला विसर-अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: १७  परळी नगरपालिका प्रशासनाकडून शहरात प्रमुख ठिकाणी आणि गल्लोगल्ली कर वसुलीचे बोर्ड लावले आहेत अगोदरच नागरिकांच्या सुविधेबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे त्या संदर्भात नागरिक पालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरतील असे चित्र दिसू लागले आहे नागरिक यांना सुविधा देणे हे नगरपालिकेचे आद्य कर्तव्य असताना सुद्धा बोर्ड लावणे ते पण सक्तीचे हे चुकीचे असून याचा जाहीर निषेध सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी व्यक्त केला असून धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे पालिका पिण्याच्या पाण्याबाबतीत वागत आहे. परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर वान धरणात दोन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे टक्केवारीनुसार तो 60 टक्के इतका आहे. माता भगिनींना सध्या मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे मात्र याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता पालिकेने किमान दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. शहरातील अनेक गल्ल्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थितपणे पुरवठा होत नाही आणि दुसरीकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी घरपट्टी भरा अन्यथा जप्तीची कारवाई असे फलक लावले जात आहेत ही बाब निषेधार्य आहे. अगोदर पालिकेने स्वच्छता सुरळीत पाणीपुरवठा करावा आणि नंतर नागरिकांकडून कर वसुली करावी अशी मागणी केली आहे अशा पद्धतीने पालिका प्रशासनाने मोहीम राबवल्यास शहरातील महिलांना सोबत घेऊन घागर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here