Home बुलढाणा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श स्मृतिसोहळा पातुर्डा येथे साजरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श स्मृतिसोहळा पातुर्डा येथे साजरा

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220529-WA0011.jpg

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श स्मृतिसोहळा पातुर्डा येथे साजरा                          संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

तालुक्यातील संत, महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा नगरीत घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर २९ मे १९२९ रोजी आले होते. या घटनेला आजवर, ९२ वर्ष झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श सोहळा पातुर्डा ग्रामपंचायतच्या वतीने २९ मे २०२२ रोजी साजरा करण्यात आला आहे.
पातुर्डा येथील आठवडी बाजारात एक विहीर आहे या विहीरस्थळी डॉ. बाबासाहेब यांचे पदस्पर्श झाले होते. त्या ऐतिहासिक विहीर परिसरात पदस्पर्श स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरीचे लोकनियुक्त सरपंच शैलजा प्रकाशराव भोंगळ असून या कार्यक्रमात आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी श्री. राममूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाजकल्याणचे आयुक्त डॉ. अनिता राठोड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार वरणगावकर, गटविकास अधिकारी पाटील,तामगाव पोलीस स्टेशन ठाणेदार उलेमाले साहेब यांची उपस्थिती होती आहे. सकाळी ८ वाजता ऐतिहासिक विहीर परीसरात भंदत ज्ञानज्योती महास्थविर आणि भिकसुसंघ संघारामगिरी व समस्य उपासक, उपासिका संघ महाराष्ट्र यांचे हस्ते धम्मदेशना कार्यक्रम घेण्यात आला. युवा गायक प्रकाशदिप वानखडे यांचा संध्याकाळी ६ वाजता बुद्धभीम गितांचा समाजप्रबोधन कार्यक्रम पार पडला तसेच या कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते

Previous articleगावातील पाणीटंचाई करीता शासन उपाय योजना जाहीर
Next articleआरोग्य शिबिरातील रुग्णांना पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले जळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here